Wednesday, 22 May 2013

वस्तुनिष्ठ मराठी सेट नेट परीक्षा

नमस्कार,
 मी Ph. . केल्या नंतर गेल्या वर्षभरा मध्ये मराठी सेट नेट चा  अभ्यास करत  होतो. त्यातून मी " वस्तुनिष्ठ मराठी सेट नेट परीक्षा " नावाचे  सुमारे ५१० पानांचे, 5 साईजचे पुस्तक लिहिले. ते विद्याभारती प्रकाशन लातूर  यांनी आज प्रकाशित केले आहे.
M P S C ,  U P S C आणि  SET / NET सोबत ते इतर सर्व स्पर्धा परीक्षापदवी  शिक्षणासाठी  उपयुक्त आसवे हा व्यापक दृष्टीकोन ठेवला आहे. पुस्तकात  प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत चा सर्व मराठी सारस्वतांचा धांडोळा  वस्तुनिष्ठ बहुपर्यायी  स्वरुपात घेतला आहे.
संत पंत तंत आणि नामांकित कवी लेखक यांची हजारो वचणे डेली आहेत. एकूण सुमारे १० ते १२ हजार प्रश्नाचा समावेश केल्यामूळे  पुस्तकात  सेट नेट चे मागील किमान दहा  प्रश्नसंच उत्तरा सहित अभ्यासता येतात. इतर कोणत्याही  पुस्तकात आशी व्यापकता नाही म्हणून हे जाड जूड पुस्तक मराठी भाषा अभ्यासकाना वरदान ठरणार आहे. विद्याभारती प्रकाशनने याची किंमत 3५०/-  इतकी वाजवी ठेवली आहे. आपण हा ग्रंथ नक्की पाहावा आणि अभ्यासक मुलाना सांगावे असी नम्र विनंती.

आपला भाषासेवक,
   डॉ. बापू  गणपतराव घोलप