Friday, 9 December 2016

CAS/API आणि शोधनिबंधाविषयी-: CAS/API आणि शोधनिबंधाविषयी :-

          वेगवेगळ्या सेमिनार, कॉन्फरन्स अथवा संशोधन विषय नियतकालीकामध्ये शोधनिबंध पाठविताना प्राध्यापकांकडून HP  कडे नेहमीच काही प्रश्‍नांची संबंधीतांना विचारणा करण्यात येते.आपला शोधनिबंध प्रोसेडींग मध्ये अथवा रिसर्च जनरलमध्ये प्रकाशित करण्यासाठी व CAS अथवा API साठीची परिपूर्ती करण्यासाठी आपले लेख अथवा शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यकच आहे.
          अनेक प्राध्यापकांकडे चांगल्या प्रकारचे ज्ञानभंडार उपलब्ध असते, मात्र ते व्यवस्थीत सादर न करु शकल्यामुळे त्यांना UGC च्या नियमांची पुर्तता करणे कठीण जाते. आजकाल रिसर्च जर्नल अथवा प्रोसेडींगसाठी शोधनिबंध पाठविण्याची प्रक्रिया संगणकीकृत व ऑनलाईन झालेली आहे. विद्यावार्ताकडे या संबंधी वारंवार कांही प्रश्‍न विचारले जातात.