Posts

विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक तयारीसाठी स्वतःला सक्षम करावे : एपीआय योगेश शिंदे

Image
परळी वैजनाथ : महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचे व व्यावसायिक शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक तयारीसाठी स्वतः सक्षम व्हावे आणि वाचन आणि आवातर अभ्यासातही रुची निर्माण करावी असे मत परळी शहर पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश शिंदे यांनी व्यक्त केले. नवगण महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की आज स्पर्धात्मक युगामध्ये व्यावसायिक शिक्षण महत्त्वाचे आहे तितकेच अतिशय कौशल्याने स्पर्धात्मक तयारी करणे ही महत्त्वाचे आहे. यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ एम जी राजपांगे, श्री बाळासाहेब देशमुख, उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे,प्रमुख श्री दत्ता गित्ते, श्री मदणे साहेब इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य श्री बाळासाहेब देशमुख यांनी महाविद्यालयाची इतिहास आणि परंपरा सांगत असतानाच विद्यार्थ्यांच्या उपस्थिती आणि सांस्कृतिक अभिरुची विषयी मार्मिक भाष्य केले. प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांच्या  हस्ते सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा विभागाच्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रम आणि कलागुनाच्या