परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे नागापूर येथे 14 ते 20 फेब्रुवारी मध्ये संपन्न होत आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक परळी येथील रेडिओलॉजिस्ट डॉ अनिल कुमार घुगे हे बोलत होते यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्री बाळासाहेब देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, नागापूरच्या सरपंच मंगलताई रमेश तोंडारे , संतोष सोळंके, मोहन सोळंके, परमेश्वर सोळंके, कुंडलिक सोळंके, कैलास सोळंके इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. घुगे म्हणाले की विद्यार्थ्यांना चटपटीत खाण्याचे आणि कोल्ड्रिंक्स वगैरे रासायनिक पेय पिण्याचे व्यसन लागले आहे त्याचप्रमाणे मोबाईलचे व्यसन हे देखील आरोग्यास घातक आहे. यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. यावेळी नवगण महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी नागापूरच्या नागरिकांचा आणि नवगण महाविद्यालयाचा फार जुना संबंध असून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी येथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आ
Comments
Post a Comment