मराठी प्रकाशन संस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख

_बीड (16 ऑगस्ट  )_ :
संगणक आणि इंटरनेटच्या ऑनलाईन युगामध्ये छापील पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी होत असताना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या हर्षवर्धन पब्लिकेशन या संशोधनविषयक प्रकाशन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. 
उच्च शिक्षणामध्ये संशोधन विषयक बाबींकरीता विशिष्ट मानांकन असणारी पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित करणे ही महत्त्वपूर्ण अट ठेवली गेली आहे, त्या अनुशंगाने अर्चना घोडके यांनी २०१२ मध्ये हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि. ही प्रकाशन संस्था सुरू केली. या प्रकाशनाची विद्यावार्ता बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण भारतात आणि अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान , तुर्की, मलेशिया इत्यादी देशात पोहोचली आहे.
भारतीय उच्च शिक्षण प्रणालीची शिखर संस्था यूजीसीने निर्गमित केलेल्या अटीनुसार विद्यावार्ताने पात्रतेच्या बहुतांश बाबी पूर्ण केल्यामुळे *महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापकांना आणि एमफिल, पीएचडी पदवी करता रिसर्च करणाऱया संशोधक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे.*
                पुस्तके हातात घेऊन वाचण्याची अथवा आपले लेखन स्वहस्ताक्षरात लिहून देण्याची पारंपरिक पद्धत आता बदलली असून डिजिटल स्वरूपात डेटा पुरविला जातो आणि संगणक इंटरनेटच्या माध्यमातून प्रकाशित केला जातो, वाचकांना देखील ही बाब सोयीची ठरत असल्याचे मत या प्रकाशनाचे संपादक डॉ बापूजी घोलप यांनी व्यक्त केले.हर्षवर्धन प्रकाशनाच्या यशस्वीतेमध्ये तंत्रज्ञानाची मदत आणि वाचकांच्या पसंतीनुसार सुविधा देणे हा मंत्र महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही मत डॉ घोलप यांनी व्यक्त केले.
                यूजीसीने विद्यावार्ता आणि प्रिंटिंग एरिया या रिसर्च जर्नलला मान्यता दिलेली होती (२०१७-२०१८) *केंद्र सरकारच्या बौद्धिक संपदा विभागाचे रजिस्टर्ड ट्रेडमार्क या दोन्ही नियतकालिकांना प्राप्त झालेले आहे. ७.९४० इतका इम्पॅक्ट फॅक्टर असलेली* ही मराठी मुलखातील मासिके www.vidyawarta.com या वेबसाइटवरही ऑनलाइन उपलब्ध आहेत.
नव्या पिढीमध्ये वाचन_लेखन कमी झाले आहे असे बोलले जाते ही गोष्ट दिशाभूल करणारी आहे, वास्तविक डिजिटल स्वरूपात लेखन आणि वाचनही मोठ्या प्रमाणात होत आहे.
केवळ माध्यम आणि पद्धती बदलली आहे ही बाब या हर्षवर्धन प्रकाशनाच्या  कर्मचाऱ्यांशी चर्चा करताना जाणवली. मराठी प्रकाशकांनी अथवा कोणत्या ही प्रकाशकांनी विशिष्ट क्षेत्रातील एक शाखा निवडून त्यामध्ये सातत्यपूर्ण का काम केल्यास यश नक्की मिळते ही गोष्ट या ठिकाणी पुन्हा अधोरेखित झाली.
शिक्षण क्षेत्रात नवनवीन *शोध प्रबंध येतात त्यांना आयएसबीएन सह पुस्तक स्वरुपात प्रकाशित करण्यासाठी ग्रामीण भागातील ही एक व्यावसायिक प्रकाशन संस्था आहे.* भारतातील सर्वच शहरातून आणि विद्यापीठातून प्राध्यापक आणि संशोधकांचा पुस्तके प्रकाशित करण्यासाठी हर्षवर्धन पब्लिकेशनकडे ओघ वाढत आहे. त्यांच्या दशकपूर्तीकडील वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा . . .!

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे