नवगण महाविद्यालयात सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना





परळी : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र ,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र , इतिहास इत्यादी सामाजिक शास्त्रांचे अध्ययन अध्यापन होते. या विषयांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनि त्यांच्या वाङ्मय मंडळाची अर्थातच सामाजिकशास्त्र मंडळाची आज प्रा. डी के आंधळे यांच्या प्रमुख   उपस्थितीमध्ये स्थापना केली.

यावेळी बोलताना प्रा. आंधळे म्हणाले की सामाजिकशास्त्र मुळे जीवनविषयक कौशल्यांची समीक्षा आणि परीक्षा होते. साहित्यातील अभिव्यक्ती प्रमाणेच सामाजिक विचार आणि चिंतन व्यक्त करण्यासाठी सामाजिकशास्त्र मंडळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते.
अभ्यास मंडळाच्या सचिवपदी  माने गोविंद दिलीपराव यांची तर  अध्यक्षपदी श्वेता जगदीशप्रसाद  दुबे यांची निवड करण्यात आली आहे .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. बबन झांजे यांनी केले तर आभार डॉ राजा आचार्य यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास सर्व सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार