कास पठार (सातारा जिल्हा) सज्जनगड,ठोसेघरचा धबधबा, प्रतापगड,सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिम घाट



महाराष्ट्रात सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि पश्चिम घाट हा भाग निसर्ग सौंदर्याच्या दृष्टीने अत्यंत समृद्ध परिसर आहे पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा हा निसर्गाचा आशीर्वाद लाभलेला संपन्न जिल्हा आहे सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात पर्यटनासाठी सुंदर अशी ठिकाणे आहेत कास पठार ठोसेघरचा धबधबा सज्जनगड चाळकेवाडी अजिंक्यतारा बामनोली यासारखी अत्यंत रमणीय ठिकाणे आहेत

कास पठार म्हणजे जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणार्या विविध रानफुलांसाठी जगप्रसिद्ध आहे समुद्र सपाटीपासून 1200 मीटर उंचीवर असलेले हे पठार सातारा शहरापासून 25 किलोमीटर अंतर अंतरावर आहे या पठारावर लहान मोठ्या आकाराची 280 प्रजातींची फुले फुलतात आणि वर्षभरातून पावसाळी हवामानात ही फुले विशिष्ट काळच अस्तित्वात असतात 2012 मध्ये युनेस्कोने कास पठाराला जागतिक वारसास्थळ म्हणून संरक्षित केले आहे पठारावर जाण्यासाठी वनविभागाची प्रत्येकी 100 रुपयांची पावती असते आणि याची ऑनलाइन नोंदणी करावी लागते http://www.kaspathar.com दररोज केवळ तीन हजार पर्यटकांना पठारावर प्रवेश दिला जातो जगातील नष्ट होत असलेल्या दुर्मिळ39 प्रजातींची फुले कास पठारावर आढळली आहेत तर 59 नष्ट होत असणाऱया सरपटणार्या प्राण्यांच्या प्रजाती येथे आढळतात


तारळी नदीवर साताऱयापासून 20 किमी अंतरावर असणारा ठोसेघर हा धबधबा गेल्या अनेक वर्षांपासून वर्षा सहलीसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरत आहे प्रचंड वेगाने 350 मीटर उंचीवरून दरीत कोसळणारा हा पाण्याचा प्रवाह अक्षरश अंगावर काटा उभा करणारा आहे आजू बाजूच्या झाडीतून झेपावणारा हा धबधबा डोळ्याचे पारणे फेडतो पाण्याची मनोहरी दृश्य पाहण्यासाठी वनखात्याकडून कठडे बांधले गेले आहेत धबधब्याचा जवळून आणि दवबिंदूंचा आनंद घेण्यासाठी मनोरे उभारले आहेत पावसाळा वगळता इतर वेळी धबधब्याच्या पायथ्याशी जाता येते दरवर्षी जुलैत डिसेंबरदरम्यान येथे पर्यटकांची गर्दी असते


कास पठार आपल्या निसर्गरम्य सौंदर्य, त्याचे पाहुण्यांचे लोक, धार्मिक आणि सांस्कृतिक सामंजस्य, वारसा, वास्तुकला, कला आणि संस्कृती यापूर्वीच स्थापन झालेली आहे. राष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय स्तरावरील आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणूनच हे स्थान लोकप्रिय आहे. प्रक्रिया अलिकडच्या वर्षांत, स्थानिक आणि परदेशी पर्यटकांची संख्या रेकॉर्ड उच्च गाठली आहे. कास पठार नावाचे फूल या व्हॅलीच्या नैसर्गिक सौंदर्य, शांती आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी आम्ही तुमच्या सूचना, सहकार आणि शुभकामनांचीही अपेक्षा करतो.


प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते त्यातील एक सज्जनगड हा किल्ला आहे समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगडावर आणि भोवताली निसर्गशोभा प्रेक्षणीय आहे समुद्रसपाटीपासून तीन हजार फूट उंचीवर असणारा हा किल्ला शंखाकृती आहे 1673 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडून हा किल्ला घेतला 1682 मध्ये समर्थांनी या किल्ल्यावर आपला देह ठेवला पर्यटनासोबतच समर्थांच्या समाधी स्थळाच्या दर्शनासाठी येथे हजारो लोक येतात गडावरील समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर हा आध्यात्मिक शांती प्रदान करणारा विषय आहे

निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटताना उन वाऱ्याची सोबत बोलले पाहिजे त्यात हरवून गेले पाहिजे हिरवाईचा शालू पांघरलेली धरती आपल्या स्वागतासाठी सज्ज असते रंगीबेरंगी रानफुले झाडं झुडूप नवतरुण पालवी आणि गवताच्या पात्यांवर विसावलेले पाण्याचे थेंब अपसूकच आपल्या अंतर्मनात लागावी जागे करतात पावसाची आणि निखळ निसर्गाची लयलूट करण्यासाठी उघड्या आकाशाखाली अल्प पाहिजे ऊन पावसात भिजल पाहिजे
Dr Gholap Bapug
www.vidyawarta.com/02
9850203295

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे