मराठी प्रकाशन संस्थेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख

_बीड (16 ऑगस्ट )_ : संगणक आणि इंटरनेटच्या ऑनलाईन युगामध्ये छापील पुस्तके वाचण्याचे प्रमाण कमी होत असताना महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यातून प्रकाशित होणाऱ्या हर्षवर्धन पब्लिकेशन या संशोधनविषयक प्रकाशन संस्थेने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे. उच्च शिक्षणामध्ये संशोधन विषयक बाबींकरीता विशिष्ट मानांकन असणारी पुस्तके आणि शोधनिबंध प्रकाशित करणे ही महत्त्वपूर्ण अट ठेवली गेली आहे, त्या अनुशंगाने अर्चना घोडके यांनी २०१२ मध्ये हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा.लि. ही प्रकाशन संस्था सुरू केली. या प्रकाशनाची विद्यावार्ता बहुभाषिक संशोधन पत्रिका गेल्या दहा वर्षांमध्ये संपूर्ण भारतात आणि अमेरिका, श्रीलंका, पाकिस्तान , तुर्की, मलेशिया इत्यादी देशात पोहोचली आहे. भारतीय उच्च शिक्षण प्रणालीची शिखर संस्था यूजीसीने निर्गमित केलेल्या अटीनुसार विद्यावार्ताने पात्रतेच्या बहुतांश बाबी पूर्ण केल्यामुळे *महाविद्यालयीन व विद्यापीठातील प्राध्यापकांना आणि एमफिल, पीएचडी पदवी करता रिसर्च करणाऱया संशोधक विद्यार्थ्यांना याचा फायदा मिळत आहे.* ...