Posts

Showing posts from January, 2023

सुजान पिढीच्या उभारणीसाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे- वैजनाथ सोळंके

Image
सुजाण आणि सुज्ञ पिढीच्या निर्मितीसाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्या स्वप्नांना आकार तेथूनच येतो असे मत ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके यांनी नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी नागपिंपरी येथे व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा योजना समारोपारंभ मौजे नागपिंपरी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री गोपाळ आंधळे माजी शिक्षण सभापती नगरपरिषद परळी वैजनाथ तसेच श्री वैजनाथ सोळंके शिवसेना जेष्ठ नेते परळी वैजनाथ, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कॅप्टन डॉ.मधुकर राजपांगे , मौजे नागपिंपरी सरपंच सौ सविताताई अंकुश मुंडे यांचे सासरे श्रीहरी बाबुराव मुंडे तसेच उपसरपंच लक्ष्मण काशिनाथ रंजवे, ज्येष्ठ नागरिक श्री अच्युतराव मुंडे पत्रकार श्री महादेव गीते इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना गोपाळ आंधळे यांनी असे सांगितले आजकाल नोकरी ही दुरापास्त झाली आहे. तसेच लोकांना कामाचा ताण जास्त झाला आहे व त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ उद्देश सांगितला व वाल्या कोळी ची गोष्ट सांगितली तसेच मनुष्याच्या आयुष्यामध्ये संगत साथ सोबत चांगली असावी लागते असे सां

मोफत सूत्रसंचालन व भाषण कोर्स. !!!

Image
*🎯घरबसल्या सूत्रसंचालन व भाषण करायला शिका!!!* *🎯ह्या संधीचा जरूर लाभ घ्या!!!*  *🎯सर्व क्षेत्रात प्रभावीपणे सूत्रसंचालन व भाषणाचे कौेशल्यप्राप्त करण्याचे सरळ सोेप्या शब्दात तंत्र*     *तुम्ही काय शिकाल यामध्ये*   *🎯सूत्रसंचालन व भाषण म्हणजे काय. व ते कसे करावे.* *🎯सूत्रसंचालनाचे भाषणाचे  विविध पैलु* *🎯मनातील भिती कशी घालवावी* *🎯प्रभावी सूत्रसंचालन व प्रभावी भाषण कसे करावे* *🎯देहबोली* *🎯आवाज, चठ उतारा, वाचाशुध्दी,शेर शायरी,म्हणी* *🎯 सूत्रसंचालनाचे व भाषणाचे नियोजन कसे करावे* *🎯सूत्रसंचालन स्क्रिफ्ट कशी तयार करावी. आपले भाषण कसे लिहावे*. _या कोर्समध्ये शिकविण्यात येणारे सुमारे 60 व्हिडिओ पुढील एकाच लिंक वर उपलब्ध आहेत._ https://youtube.com/playlist?list=PL1U1zx6ZVg-jhHxMRNFO0MnHkKTBUMb7K *सुप्रसिद्ध मार्गदर्शक* :  *डॉ. बापू घोलप* याचा फायदा..... *स्पर्धा परीक्षेसाठी अभ्यास करणारे विद्यार्थ्यांसाठी* *सेल्स मध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसाठी*  *नोकरदार व्यक्तींसाठी*  *सर्व व्यावसायिक व्यक्तींसाठी* *नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रामध्ये काम करणारे व्यक्तींसाठी* *इन्शुरन्स सेक्

थोर समाजसुधारक हेच आपले खरे मार्गदर्शक : श्री बाळासाहेब देशमुख

Image
संत तुकडोजी महाराज , छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले इत्यादींसारखे समाजसुधारक हेच आजही आजच्या काळामध्ये आपल्याला दिशादर्शक आणि मार्गदर्शक विचार पुरवितात असे मत बाळासाहेब देशमुख यांनी नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मौजे नागपिंपरी येथे व्यक्त केले. नवगण महाविद्यालयाचे मौजे नागपिंपरी येथे सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होत आहे याच्या उद्घाटन याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कॅप्टन डॉ.मधुकर राजपांगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार यल्लावाड, श्री अंकुश मुंडे तसेच ग्रामसेवक रणजीत इंगोले, उपसरपंच लक्ष्मण रंजवे  प्रतिष्ठित नागरिक साहेबराव मुंडे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ यल्लावाड यांना थोर समाज पुरुषांचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरतात तसेच आज आपल्यासमोर दीपस्तंभ म्हणून आदर्श कोणाला ठेवावे आणि तरुणांनी कशी वाटचाल करावी यासंबंधी मार्गदर्शन केले. श्री अंकुश मुंडे यांनी राष्ट्रीय

नवगण महाविद्यालयामध्ये अजीवन व विस्तार विभागाची दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये नुकतेच डॉ संजय मून यांच्या उपस्थितीमध्ये आजीवन व विस्तार विभागाची केंद्र सुरू करण्यात आले या केंद्राच्या वतीने दिनांक 23 व 24 जानेवारी रोजी दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली. पहिल्या सत्रामध्ये दिनांक 23 रोजी प्रा दत्तात्रेय आंधळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ज्ञानाशिवाय मार्ग नाही. विद्या मनुष्याला नम्रता प्रदान करते व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक ज्ञानवंतांची त्यांनी उदाहरणे दिली. तसेच यावेळी डॉ. धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व भाषा शिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे यांनी ज्ञान ऐकल्याने वृद्धिंगत होते असे मत व्यक्त केले या सत्राचे सूत्रसंचालन डॉ दयानंद कुरुडे यांनी केले तर प्रास्ताविक विस्तार अधिकारी प्रा राहुल सोनवणे यांनी व आभार डॉ प्रकाश फड यांनी व्यक्त केले. दुसरे सत्र दिनांक 24 जानेवारी संपन्न झाले. यामध्ये डॉ मिलिंद सोनकांबळे यांनी स्पर्धा परीक्षा ही आजच्या जीवनामध्ये महत्त्वाची असून स्पर्धेच्या अभ्यास

विद्यार्थ्यांनी विषयातील कौशल्यांची जपवणूक करणे काळाची गरज: डॉ. संजय मून

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आयोजित आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्राचे उद्घाटन प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागाचे संचालक डॉ. संजय मुन हे बोलत होते प्राचार्य कॅप्टन डॉ.एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी यावेळी व्यासपीठावर डॉ प्रकाश फड, डॉ लालासाहेब घुमरे , प्रा. राहुल सोनवणे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना डॉ. म्हणून म्हणाले की आपल्या  देशामध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक अभ्यासक्रमामध्ये कौशल्य भरपूर भरपूर आहेत त्याचा शोध आणि उपयोजन गरजेचे आहे. यावेळी नवगण महाविद्यालयामध्ये 'कोविड काळातील अनुभव" या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली त्याचे प्रथम पारितोषिक ऋतुजा मोगरे द्वितीय पारितोषिक श्वेता दुबे तर तृतीय पारितोषिक कुमारी मायावती मोगरे यांना प्रदान करण्यात आले.  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना डॉ राजपांगे म्हणाले की आजीवन शिक्षण व विस्तार सेवा केंद्रामुळे विद्यार्थ्यांना आपल्या प्रात्यक्षिक ज्ञानाच्या उपयोजनाची चांगली संधी मिळते महाविद्यालयातील या केंद्राचा लाभ सर्

विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त नवगण महाविद्यालयात भीमगीत गायन संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या नामविस्तार दिनानिमित्त भीम गीत गायन घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संगीत विभागाच्या वतीने डॉ. महेश दाडगे, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. जोशी मॅडम यांच्यासह विद्यार्थ्यांनी भीम गीत गायन सादर केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे हे होते तर डॉ. राजा आचार्य यांनी विद्यापीठ नामविस्ताराची पार्श्वभूमी सांगून नामविस्तार चळवळीत जीवाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सोनवणे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे यांची उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवन व कार्य विषयक विविध उपक्रम घेण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्राध्यापक वृंदांनी  त्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉ राजपांगे म्हणाले की महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकांमध्ये किंवा इतिहासामध्ये उल्लेखनीय राहता कामाचे नाहीत तर ते आपण आज आचरणात आणले पाहिजेत त्याचे वाचन आणि उजळणी केली पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ धायगुडे यांनी व आभार डॉ मचाले यांनी व्यक्त केले