नवगण महाविद्यालयामध्ये अजीवन व विस्तार विभागाची दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये नुकतेच डॉ संजय मून यांच्या उपस्थितीमध्ये आजीवन व विस्तार विभागाची केंद्र सुरू करण्यात आले या केंद्राच्या वतीने दिनांक 23 व 24 जानेवारी रोजी दोन दिवशीय कार्यशाळा संपन्न झाली.
पहिल्या सत्रामध्ये दिनांक 23 रोजी प्रा दत्तात्रेय आंधळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ज्ञानाशिवाय मार्ग नाही. विद्या मनुष्याला नम्रता प्रदान करते व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक ज्ञानवंतांची त्यांनी उदाहरणे दिली.
तसेच यावेळी डॉ. धायगुडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व भाषा शिक्षण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय समारोप मध्ये प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे यांनी ज्ञान ऐकल्याने वृद्धिंगत होते असे मत व्यक्त केले या सत्राचे सूत्रसंचालन डॉ दयानंद कुरुडे यांनी केले तर प्रास्ताविक विस्तार अधिकारी प्रा राहुल सोनवणे यांनी व आभार डॉ प्रकाश फड यांनी व्यक्त केले.
दुसरे सत्र दिनांक 24 जानेवारी संपन्न झाले. यामध्ये डॉ मिलिंद सोनकांबळे यांनी स्पर्धा परीक्षा ही आजच्या जीवनामध्ये महत्त्वाची असून स्पर्धेच्या अभ्यास करण्यासाठी औरंगाबाद विद्यापीठांतर्गतही चांगल्या सुविधा उपलब्ध असल्या पाहिजेत असे मत व्यक्त केले. दुसऱ्या सत्रामध्ये प्रसिद्ध उद्योजक सुरेश आण्णा टाक यांची मुलाखत प्रा. राहुल सोनवणे यांनी घेतली उद्योगांमध्ये यशस्वी होण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे केवळ नोकरीच्या मागे न लागता छोट्या-मोठ्या उद्योगाचे आपण मालक होऊ शकतो असे मत त्यांनी व्यक्त केले. दुसऱ्या सत्राच्या अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे यांनी जीवन जगत असताना शून्यातून विश्व निर्माण करण्याची धमक तरुणांमध्ये असली पाहिजे असे मत व्यक्त केले या सत्राचे सूत्रसंचालन डॉ देशमुख सर यांनी केले तर प्रस्ताविक प्रा सोनवणे व आभार डॉ प्रकाश फड यांनी व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन