विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त नवगण महाविद्यालयात भीमगीत गायन संपन्न
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 14 जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या नामविस्तार दिनानिमित्त भीम गीत गायन घेण्यात आले.
यावेळी महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व संगीत विभागाच्या वतीने डॉ. महेश दाडगे, प्रा. राहुल सोनवणे, प्रा. जोशी मॅडम यांच्यासह विद्यार्थ्यांनी भीम गीत गायन सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे हे होते तर डॉ. राजा आचार्य यांनी विद्यापीठ नामविस्ताराची पार्श्वभूमी सांगून नामविस्तार चळवळीत जीवाचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. सोनवणे सर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास बहुसंख्य विद्यार्थी व प्राध्यापक वृंद उपस्थित होते.
Comments
Post a Comment