Posts

Showing posts from October, 2022

परळीतील विद्यार्थिनीची औरंगाबाद विद्यापीठाच्या हॉलीबॉल आंतर विद्यापीठीय क्रीडा संघामध्ये निवड

Image
नवगण महाविद्यालय परळीची विद्यार्थिनी मोनिका जमदाडे हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलींच्या हॉलीबॉल संघामध्ये अंतर विद्यापीठ क्रीडा  स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. नवगण महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा प्रकारांकरिता मार्गदर्शन आणि नियमित सराव घेण्यात येतो. क्रीडांगणसह सर्व सुविधांनी संपन्न असलेल्या या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा पुरविण्यात येतात. याचेच फलित म्हणून विद्यापीठीय व राज्यस्तरीय संघामध्ये येथील विद्यार्थ्यांची निवड होते असे मत प्राचार्य डॉ एम.जी.राजपांगे यांनी यावेळी व्यक्त केले. कु.मोनिकाच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.रवींद्र मचाले, डॉ. उध्दवराव मुळे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

नवगण महाविद्यालयात सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना

Image
परळी : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र ,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र , इतिहास इत्यादी सामाजिक शास्त्रांचे अध्ययन अध्यापन होते. या विषयांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनि त्यांच्या वाङ्मय मंडळाची अर्थातच सामाजिकशास्त्र मंडळाची आज प्रा. डी के आंधळे यांच्या प्रमुख   उपस्थितीमध्ये स्थापना केली. यावेळी बोलताना प्रा. आंधळे म्हणाले की सामाजिकशास्त्र मुळे जीवनविषयक कौशल्यांची समीक्षा आणि परीक्षा होते. साहित्यातील अभिव्यक्ती प्रमाणेच सामाजिक विचार आणि चिंतन व्यक्त करण्यासाठी सामाजिकशास्त्र मंडळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते. अभ्यास मंडळाच्या सचिवपदी  माने गोविंद दिलीपराव यांची तर  अध्यक्षपदी श्वेता जगदीशप्रसाद  दुबे यांची निवड करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. बबन झांजे यांनी केले तर आभार डॉ राजा आचार्य यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास सर्व सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते

नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे वाणिज्य वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयासाठी  अभ्यासक्रम उपलब्ध असून आज डॉ राजकुमार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ राजकुमार जोशी यांनी जागतिकीकरणामुळे जगभरामध्ये व्यापार व संघटनांमध्ये झालेले बदल यांची चर्चा केली डिजिटल अॅप, सॉफ्ट स्कील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी वाणिज्य व व्यापार पध्दती मध्ये झालेले बदल आणि ऑनलाईन व्यवहार याविषयी सविस्तर जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ अनुराधा चंद्रे यांनी केले तर  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ राजपांगे म्हणाले की आधुनिक काळामध्ये तंत्रस्नेही आणि ऑनलाइन व्यापार उदिमाचे शिक्षण नसेल तर अशिक्षित ठरण्याची शक्यता आहे. आभारप्रदर्शन डॉ राजकुमार आचार्य यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बहुसंख्य प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

स्वर्गीय केशर काकू आमच्या सावित्री _प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे

Image
नवगण महाविद्यालय परळी येथे गृहविज्ञान विभागाच्या वतीने स्वर्गीय सौ. केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि स्मरणार्थ  महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या  विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ राजपांगे हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की  काकूं चे तळागाळातील विद्यार्थिनींसाठी असलेली तळमळ,  विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी उभारलेल्या शाळा महाविद्यालय आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी असलेली त्यांची धोरणे ही सावित्रीबाई फुले यांच्या तत्वावर आधारित होती. त्यामुळेच आज ऊसतोड असलेल्या बीड जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्त्री शिक्षण, भारतीय स्त्री, स्त्रियांचे समाजातील स्थान यासारख्या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी  भरभरून प्रतिसाद दिला. उत्कृष्ट तीन निबंधांना बक्षीसे देण्यात आली. याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले आणि प्रोत्साहन

नवगण महाविद्यालयात लोकनेत्या स्व. केशरकाकू क्षीरसागर यांची पुण्यतिथी साजरी

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज बीडच्या माजी खासदार लोकनेत्या स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम.जी. राजपांगे यांनी काकूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना डॉ रवींद्र मचाले यांनी केशरकाकू क्षीरसागर यांच्या राजकीय सामाजिक कार्याची माहिती सांगितली. मराठवाड्याच्या विकासात महिला खासदाराचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ राजाभाऊ धायगुडे यांनी व्यक्त केले. पुण्यतिथी कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .