नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे वाणिज्य वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना

परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयासाठी  अभ्यासक्रम उपलब्ध असून आज डॉ राजकुमार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली.

यावेळी बोलताना डॉ राजकुमार जोशी यांनी जागतिकीकरणामुळे जगभरामध्ये व्यापार व संघटनांमध्ये झालेले बदल यांची चर्चा केली डिजिटल अॅप, सॉफ्ट स्कील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी वाणिज्य व व्यापार पध्दती मध्ये झालेले बदल आणि ऑनलाईन व्यवहार याविषयी सविस्तर जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ अनुराधा चंद्रे यांनी केले तर  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ राजपांगे म्हणाले की आधुनिक काळामध्ये तंत्रस्नेही आणि ऑनलाइन व्यापार उदिमाचे शिक्षण नसेल तर अशिक्षित ठरण्याची शक्यता आहे. आभारप्रदर्शन डॉ राजकुमार आचार्य यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बहुसंख्य प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे