Posts

Showing posts from January, 2024

महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन नवीन पद्धतीनुसार, जून 2024 पासून होणार अंमलबजावणी.

Image
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. फ. अश्या सर्व  मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये समानता अथवा बदल करण्याचे प्रस्तावित होते, त्यामधील नॅकच्या अनुषंगाने गठीत इस्रो चे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारला असून, २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या नॅक च्या बैठकीत ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा झाली आणि जून २०२४ पासून ही मूल्यांकन प्रक्रिया लागू करण्याचे ठरले. नवीन मूल्यांकनामध्ये आमुलाग्र बदल होणार असून, आत्ता अस्तित्वात असलेली आणि ज्या मुळे महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे, आता फक्त त्या महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले अथवा नाही (बायनरी) एवढाच भाग असणार आहे. नॅक साठी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सोपी करणेत आली असून, One Nation One Data या प्लॅटफॉर्म चा सदर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असणार आहे, महाविद्यालयांना नॅक साठी आवश्यक असणारा डाटा हा या प्लॅटफॉर्म वर ठेवावा लागणार आहे, जेणेकरून प्रत्यक्ष महा

भारताची महासत्तेकडील वाटचाल

*उप विषय* 1. भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल 2. जी 20 3. कृषी क्षेत्रातील बदल (नवीन योजना) 4. सेवा क्षेत्रातील बदल 5. उद्योग क्षेत्रातील बदल 6. आरोग्य क्षेत्रातील बदल 7. शिक्षण क्षेत्रातील बदल नवीन शैक्षणिक धोरण 2020 8. संरक्षण क्षेत्रातील बदल : युद्ध निती 9. भारताच्या परराष्ट्र धोरनातील बदल 10. अंदाजपत्रकातील बद्दल 11. कर प्रणालीत झालेला बदल 12. भारताचे शेजारच्या राष्ट्राशी व इतर देशांशी असलेले संबंध (आर्थिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक इ.) 13. व्यापार व बाजार व्यवस्थेत झालेले बदल 14. भारत व जागतिक संघटना 15. बॅंकिंग क्षेत्रात झालेले बदल 16. आयात निर्यातातून भारताची महासत्तेच्या दिशेने होणारी वाटचाल 17. जी डी पी आणि वित्तीय तूट पूर्वी आता 18. अंतराळ क्षेत्रात भारताची प्रगती 19. राज्य घटनेला होत असलेली 75 वर्ष 20. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी व समतोल राखण्यासाठी झालेले बदल 21. विविध भाषेतील साहित्य निर्मिती वर झालेले बदल 22.भारतीयांच्या राहणीमान व उपजीविकेवर झालेले बदल 23. सामाजिक परिस्थिती व समाजमनावर झालेले बदल 24. राजकारण व राजकीय समस्यांनमधील बदल 25. आय टी क्षेत्रातील बदल 26. विविध का

नवगण शिक्षण संस्था राजूरीचे कला व वाणिज्य महाविद्यालय परळी. वै. येथे मतदार दिन साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व प्रमूख वक्ते नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी वै. इंग्रजी विभागाचे प्रा. पुरी डि एस. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वानखेडे यू.डी. यांनी केले. आपला प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ. वानखेडे यू.डी. म्हणाले की, लोकशाही सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे अत्यंत महत्वाचे आहे. यानंतर प्रमूख वक्ते प्रा. पुरी.डि.एस म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. लोकशाहीत मताला अमूल्य किमत आहे. त्यामूळे मतदाना पासून कोणीही वंचीत राहू नये. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ मधूकर राजपांगे यांनी केला. अध्याक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. राजपागे एम.जी. म्हणाले की देशाच्या विकासात विका‌सात मतदारांची भूमिका फार महत्वपूर्ण असते. या कार्यक्रमात मतदान ओळखपत्र प्राप्त झालेली विद्यार्थीनी कु. ऋतुजा मोगरे यांना ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सोनवण

बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारी, तर डॉ मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

Image
*राज्यपालांकडून सीओईपी'च्या कुलगुरुपदी डॉ सुनील भिरुड यांची नियुक्ती*   राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली.  डॉ विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते.  राज्यपालांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.   राज्यपाल बैस यांनी डॉ सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे.  डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत.  सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत - यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत - करण्यात आली

प्रा. झिंजुर्डे यांच्या पर्यावरण विषयक काव्य गायनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

Image
poem video परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये विविध व्याख्याते व मार्गदर्शकांद्वारे चर्चा विमर्श होत आहे या च्या समारोपप्रसंगी प्राध्यापक झिंजुर्डे हे बोलत होते एवढं कसं तुला कळना एकही गोष्ट फुकट मिळेना ही स्वरचित पर्यावरण विषयक कविता गायन करून त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा अतिरेकी शोषण करू नये अतिरेकी वापर करू नये हा मोलाचा संदेश दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व नवगण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले समारोप कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री पंडित गुरु पार्टी कर महाविद्यालयाचे प्राध्यापक झिंजुर्डे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण सवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले  तर डॉ राजपांगे यांनी 21 व्या शतकात होत असलेल्या पर्यावरण विषयक घडामोडींचा आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ पी एच चौधरी यांन

नवगण महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये विविध व्याख्याते व मार्गदर्शकांद्वारे चर्चा विमर्श होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व नवगण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर होत असून आज दि 12 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ व्ही एल फड , वैद्यनाथ महाविद्यालय परळी यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील डॉ वाघमारे एस डी यांनी पर्यावरण सवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केल तर डॉ राजपांगे यांनी 21 व्या शतकात होत असलेल्या पर्यावरण विषयक घडामोडींचा आढावा घेतला डॉ फड यांनी पर्यावरण ही काळाची गरज आहे हे विविध उदाहरणाद्वारे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ पी एच चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बबन मोहिते यांनी केले. कार्यक्रमास म