नवगण महाविद्यालयात पर्यावरण संरक्षण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये विविध व्याख्याते व मार्गदर्शकांद्वारे चर्चा विमर्श होणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व नवगण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर होत असून आज दि 12 जानेवारी रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ व्ही एल फड , वैद्यनाथ महाविद्यालय परळी यांच्या हस्ते या प्रशिक्षणाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील डॉ वाघमारे एस डी यांनी पर्यावरण सवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर स्लाईड शो द्वारे मार्गदर्शन केल तर डॉ राजपांगे यांनी 21 व्या शतकात होत असलेल्या पर्यावरण विषयक घडामोडींचा आढावा घेतला डॉ फड यांनी पर्यावरण ही काळाची गरज आहे हे विविध उदाहरणाद्वारे सांगितले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ पी एच चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ बबन मोहिते यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे