नवगण शिक्षण संस्था राजूरीचे कला व वाणिज्य महाविद्यालय परळी. वै. येथे मतदार दिन साजरा


परळी वैजनाथ : येथील कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व प्रमूख वक्ते नवगण कला व वाणिज्य महाविद्यालय परळी वै. इंग्रजी विभागाचे प्रा. पुरी डि एस. उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. वानखेडे यू.डी. यांनी केले. आपला प्रास्ताविकपर भाषणात प्रा.डॉ. वानखेडे यू.डी. म्हणाले की, लोकशाही सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करणे अत्यंत महत्वाचे आहे. यानंतर प्रमूख वक्ते प्रा. पुरी.डि.एस म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले नांव मतदार यादीत नोंदविणे अत्यंत महत्वाचे आहे. लोकशाहीत मताला अमूल्य किमत आहे. त्यामूळे मतदाना पासून कोणीही वंचीत राहू नये. कार्यक्रमाचा समारोप प्राचार्य डॉ मधूकर राजपांगे यांनी केला. अध्याक्षिय समारोपात प्राचार्य डॉ. राजपागे एम.जी. म्हणाले की देशाच्या विकासात विका‌सात मतदारांची भूमिका फार महत्वपूर्ण असते. या कार्यक्रमात मतदान ओळखपत्र प्राप्त झालेली विद्यार्थीनी कु. ऋतुजा मोगरे यांना ओळखपत्र देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्र संचालन प्रा. सोनवणे आर.बी. यांनी केले. प्रा. कळंबे एम. पी.यांनी राष्ट्रीय मतदार दिनाची प्रतिज्ञा घेवून अभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमास सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे