प्रा. झिंजुर्डे यांच्या पर्यावरण विषयक काव्य गायनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

poem video

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये दिनांक 12 व 13 जानेवारी रोजी पर्यावरण प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये विविध व्याख्याते व मार्गदर्शकांद्वारे चर्चा विमर्श होत आहे या च्या समारोपप्रसंगी प्राध्यापक झिंजुर्डे हे बोलत होते
एवढं कसं तुला कळना एकही गोष्ट फुकट मिळेना ही स्वरचित पर्यावरण विषयक कविता गायन करून त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाचा अतिरेकी शोषण करू नये अतिरेकी वापर करू नये हा मोलाचा संदेश दिला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर व नवगण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले समारोप कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम.जी राजपांगे यांच्या अध्यक्षतेखाली श्री पंडित गुरु पार्टी कर महाविद्यालयाचे प्राध्यापक झिंजुर्डे यांनी मार्गदर्शन केले. पर्यावरण सवर्धनात मानवाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले
 तर डॉ राजपांगे यांनी 21 व्या शतकात होत असलेल्या पर्यावरण विषयक घडामोडींचा आढावा घेतला
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भूगोल विभाग प्रमुख डॉ पी एच चौधरी यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक देवानंद पुरी यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख डॉ दयानंद कुरुडे यांनी केले कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे