Posts

Showing posts from August, 2023

नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर नवगण महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आचार्य सानंदजी यांनी सांगितले की मानवाचे जीवन सुखकर बनविण्यासाठी मानवाने वेदांचा अभ्यास केला पाहिजे तसेच तसेच पुराणातील विविध संस्कृत संज्ञा आणि संकल्पनांचा सखोल अर्थ त्यांनी सांगितला. यावेळी श्री लक्ष्मण हुलगुंडे गुरुजी यांनी मराठी साहित्यातील विविध काव्यपंक्तीच्या आधारे विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण आणि आदर्शांची मांडणी कशी असावी यासंबंधीचे मार्गदर्शन केले. आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये अशा मूल्यांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी निसर्गाची शक्ती हेच ईश्वराचे खरे रूप आहे व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वसा उराशी बाळगताना या निसर्गाच्या रूपाची प्रचिती अनुभवली पाहिजे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनईपीचे नोडल अधिकारी प्रोफेसर डॉ.

नवीन जागतिक आव्हाने पेलण्यासाठी NEP 2020 चे धोरणे उपयुक्त- डॉ विनोद गायकवाड

Image
परळी वैजनाथ : नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे जागतिक स्तरावरील आव्हाने पेलण्यासाठी आणि कौशल्य विकास आधारित नवीन पिढीच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे मत येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रा गायकवाड यांनी व्यक्त केले नवगण महाविद्यालयामध्ये आज नवीन शैक्षणिक धोरणाची रूपरेषा मांडणी आणि येत्या वर्षात होणारी नवीन शैक्षणिक वर्षाची अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रा गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची स्लाईड शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे याचीही माहिती दिली यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे यांनी प्राध्यापकांनी आणि पालक, विद्यार्थ्यांनीही नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना समजून घ्यावी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ प्रकाश फड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी यांनी केले व आभार डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्