नवीन जागतिक आव्हाने पेलण्यासाठी NEP 2020 चे धोरणे उपयुक्त- डॉ विनोद गायकवाड


परळी वैजनाथ : नवीन शैक्षणिक धोरण 2020 हे जागतिक स्तरावरील आव्हाने पेलण्यासाठी आणि कौशल्य विकास आधारित नवीन पिढीच्या निर्मितीसाठी उपयुक्त असल्याचे मत येथील वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्रा गायकवाड यांनी व्यक्त केले

नवगण महाविद्यालयामध्ये आज नवीन शैक्षणिक धोरणाची रूपरेषा मांडणी आणि येत्या वर्षात होणारी नवीन शैक्षणिक वर्षाची अंमलबजावणी याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी प्रा गायकवाड यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची स्लाईड शोच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने उच्च शिक्षणासाठी त्याची कशाप्रकारे अंमलबजावणी केली जाणार आहे याचीही माहिती दिली यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे यांनी प्राध्यापकांनी आणि पालक, विद्यार्थ्यांनीही नवीन शैक्षणिक धोरणाची संरचना समजून घ्यावी आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी तयार व्हावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक या विभागाचे प्रमुख प्रोफेसर डॉ प्रकाश फड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी यांनी केले व आभार डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेश दाडगे यांच्यासह सर्व प्राध्यापक वृंद आणि मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे