नवीन शैक्षणिक धोरण 2020 या विषयावर नवगण महाविद्यालयात चर्चासत्र संपन्न


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी नवीन शैक्षणिक धोरण या विषयावर प्रमुख व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र संपन्न झाले. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आचार्य सानंदजी यांनी सांगितले की मानवाचे जीवन सुखकर बनविण्यासाठी मानवाने वेदांचा अभ्यास केला पाहिजे तसेच तसेच पुराणातील विविध संस्कृत संज्ञा आणि संकल्पनांचा सखोल अर्थ त्यांनी सांगितला. यावेळी श्री लक्ष्मण हुलगुंडे गुरुजी यांनी मराठी साहित्यातील विविध काव्यपंक्तीच्या आधारे विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण आणि आदर्शांची मांडणी कशी असावी यासंबंधीचे मार्गदर्शन केले. आजच्या शैक्षणिक धोरणामध्ये अशा मूल्यांची पेरणी करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी निसर्गाची शक्ती हेच ईश्वराचे खरे रूप आहे व विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा वसा उराशी बाळगताना या निसर्गाच्या रूपाची प्रचिती अनुभवली पाहिजे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनईपीचे नोडल अधिकारी प्रोफेसर डॉ. प्रकाश फड यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गायक प्रा. राहुल सोनवणे यांनी केले तर आभार  इतिहास विभागाचे प्रा. बबन झांजे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार