Posts

Showing posts from September, 2023

नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ न्याक चतुर्थ श्रृंखला तपासणीसाठी सज्ज

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय यूजीसीच्या निर्देशानुसार न्याकच्या चतुर्थ शृंखला तपासणीसाठी सज्ज झाले असून महाविद्यालयाच्या सर्व विभागांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे.  चतुर्थ पुनर्मूल्यांकनासाठी नेक बेंगलोर यांनी नियुक्त केलेली टीम दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी नवगण महाविद्यालय परळी येथे भेट देत असून उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता महाविद्यालयाने केली. नवगण शिक्षण संस्थेच्या पडताळणी समितीने तसेच संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करून सर्व बाबींची पूर्तता केल्याची खातरजमा केली आहे. नेक बेंगलोर यांनी नियुक्त केलेल्या पीयर टीम मध्ये 1. माननीय अध्यक्ष, प्रो. डॉ. जयचंद्रन आर., प्रोफेसर और निदेशक,भारतीय भाषा विद्यालय, केरल विश्वविद्यालय। 2. माननीय समन्वयक प्रो. डॉ. विश्वम्भर प्रसाद सती, वरिष्ठ प्रोफेसर,भूगोल और संसाधन प्रबंधन विभाग आइजोल, मिजोरम। 3. आदरणीय सदस्य प्राचार्य डाॅ. तिरुचेल्वम चिन्नैयन, प्रधानाचार्य नैना मोहम्मद कॉलेज ऑफ आर्ट्स एंड स

नवगण महाविद्यालयामध्ये मेरी माटी मेरी देश उपक्रम संपन्न

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यामध्ये प्रत्येकाने मूठभर माती संकलित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपांगे हे होते त्याचप्रमाणे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. महेश दाडगे यांची उपस्थिती होती. मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत प्रदेशातील विविध ठिकाणाहून मातीचे संकलन करून जिल्हास्तरावर एकत्रित केले जात आहे व तेथून राजधानी मध्ये संबंधित अमृत कलश पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी माननीय डॉ  राजाभाऊ धायगुडे, डॉ. रवींद्र मचाले इत्यादींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. या उपक्रमाची ग्रीनिश बुक मध्ये नोंद होणार असून त्यामध्ये महाविद्यालयाने सहभाग नोंदविलेला आहे.