Posts

Showing posts from November, 2022

संविधान दिनानिमित्त नवगण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटने संबंधी आणि संविधानासंबंधी विविध संदर्भ साहित्य , संविधानात्मक ग्रंथ आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाकांच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. लांडगे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांनी संविधानाची मूळ प्रत हाताळली आणि उद्देशिका वाचन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपांगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्या वतीने मागील आठवड्यामध्येच विविध दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती आणि सुप्रसिद्ध असे दिवाळी अंक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवगण महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे हे होते. यावेळी बोलताना डॉक्टर राजपालंगे यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटने मधील समता, बंधुता, एकात्मता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आज अभ्यासक्रमामध्ये देखील याची रुजवन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी केले व संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार सह कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदांची उपस्थिती होती.

स्त्रियांवरील अत्याचाराप्रमाणेच पुरुषांवरील अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची गरज_ अँड. शुभांगी गीत्ते

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आयोजित महिला तक्रार निवारण समितीच्या कार्यक्रमात बोलताना परळी न्यायालयातील एडवोकेट शुभांगी गीते ह्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जगामध्ये महिलावर अन्याय अत्याचार होतात त्यांचा विविध माध्यमातून विविध पद्धतीने लैंगिक छळ होतो त्यास प्रतिबंध करणारे कायदे आहेत  तसेच आता परिस्थिती पुरुषांवर लैंगिक छळाची वेळ येण्याची देखील आली आहे त्यामुळे पुरुषांनाही आपले संरक्षण करण्यासाठी कायद्याने योग्य ती कलमे आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर प्रा एस आर जोशी, प्रा अफीया उजम, प्रा. मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ राजपांगे यांनी मुला मुलींमध्ये होत असलेल्या मोबाईलच्या अतिवापराचा आणि त्याच्या दुरुपयोगाचा उल्लेख करून संस्कारी पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे व पालकांपुढील आव्हान असल्याचे मत नोंदविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्

नवगण महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये भव्य क्रीडा स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी बीड , गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहेत. दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आज परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री उमाकांत कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ.एम जी राजपांगे हे होते तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी परळी चे नवनाथ सोनवणे, डॉ लालासाहेब घुमरे, योग प्रशिक्षक श्री कराड सर हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पी आय श्री कस्तुरे साहेब यांनी विद्यार्थी जीवनामध्ये खेळाचे आणि मैदानावरील नातेसंबंधाचे महत्त्व सांगितले तर प्राचार्य राजपागे सर यांनी कोरोना नंतर आयोजित होत असलेल्या या आरोग्यवर्धक आणि निकोप शालेय जीवनाच्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व प्रतिपादन केले. परळी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा चे समन्वयक श्री संजय देशमुख यांच्या नियोजनात होत अ

नवगण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंद्रधनुष्य विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवामध्ये निवड

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयातील   चि. नामदेव विठ्ठल फड याची आंतर विद्यापीठ युवक महोत्सव साठी शास्त्रीय तालवाद्य या प्रकारासाठी निवड झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या इंद्रधनुष्य अंतर विद्यापीठ युवक महोत्सव 2022 2023 मध्ये संपन्न होत आहे. पखवाज वादनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून स्पर्धेसाठी नामदेव फड याची निवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये नवगण महाविद्यालयाच्या संगीत विभागास प्रथम पारितोषिक देखील प्राप्त झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कीर्तन भजन इत्यादी सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये आणि स्वतंत्र पखवाज सोलो वादनामध्येही नामदेव याने चांगली कसब दाखविली आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे, संगीत विभागप्रमुख डॉ महेश दांडगे, प्रा. राहुल सोनवणे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन