नवगण महाविद्यालयात संविधान दिन साजरा


परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे हे होते.
यावेळी बोलताना डॉक्टर राजपालंगे यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटने मधील समता, बंधुता, एकात्मता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आज अभ्यासक्रमामध्ये देखील याची रुजवन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी केले व संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार सह कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे