स्त्रियांवरील अत्याचाराप्रमाणेच पुरुषांवरील अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची गरज_ अँड. शुभांगी गीत्ते

परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आयोजित महिला तक्रार निवारण समितीच्या कार्यक्रमात बोलताना परळी न्यायालयातील एडवोकेट शुभांगी गीते ह्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जगामध्ये महिलावर अन्याय अत्याचार होतात त्यांचा विविध माध्यमातून विविध पद्धतीने लैंगिक छळ होतो त्यास प्रतिबंध करणारे कायदे आहेत  तसेच आता परिस्थिती पुरुषांवर लैंगिक छळाची वेळ येण्याची देखील आली आहे त्यामुळे पुरुषांनाही आपले संरक्षण करण्यासाठी कायद्याने योग्य ती कलमे आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर प्रा एस आर जोशी, प्रा अफीया उजम, प्रा. मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ राजपांगे यांनी मुला मुलींमध्ये होत असलेल्या मोबाईलच्या अतिवापराचा आणि त्याच्या दुरुपयोगाचा उल्लेख करून संस्कारी पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे व पालकांपुढील आव्हान असल्याचे मत नोंदविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्चना परदेशी यांनी केले तर आभार गृहविज्ञान विभाग प्रमुख डॉ वंदना फटाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वृंदांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे