Posts

Showing posts from 2022

परळी येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

Image
परळी वैजनाथ :  येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमास बाळासाहेब देशमुख, नरेश हलगे यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे हे होते. यावेळी परळी येथील जिल्हा उप रुग्णालयामध्ये रुग्णांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले तर स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगाई यांच्या वतीने महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. डॉ. सुजित तुमोड आणि त्यांच्यासोबत डॉ. लालासाहेब घुमरे, सय्यद मुस्ताक, यादव बी एस, शेख बाबा यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी बोलताना बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या सामाजिक कार्यात रक्तदानाचे महत्त्व सांगितले तर श्री नरेश हलगे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची उंची त्यांच्या वैचारिक आणि विकासाभमुख निर्णयामध्ये असल्याचे मत व्यक्त केल

संविधान दिनानिमित्त नवगण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शन

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय राज्यघटने संबंधी आणि संविधानासंबंधी विविध संदर्भ साहित्य , संविधानात्मक ग्रंथ आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासाकांच्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले. ग्रंथालय विभाग प्रमुख प्रा. लांडगे यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांनी संविधानाची मूळ प्रत हाताळली आणि उद्देशिका वाचन केले. ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपांगे यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रंथालय विभागाच्या वतीने मागील आठवड्यामध्येच विविध दर्जेदार दिवाळी अंकाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते यामध्ये मराठी साहित्यातील अभिजात कलाकृती आणि सुप्रसिद्ध असे दिवाळी अंक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना उपलब्ध करून देण्यात आले. ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

नवगण महाविद्यालयात संविधान दिन साजरा

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे हे होते. यावेळी बोलताना डॉक्टर राजपालंगे यांनी संविधानाचे महत्त्व सांगितले. भारतीय राज्यघटने मधील समता, बंधुता, एकात्मता या मूल्यांची जोपासना करण्यासाठी आज अभ्यासक्रमामध्ये देखील याची रुजवन होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले तसेच संविधानाची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. राजाभाऊ धायगुडे यांनी केले व संविधान निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या योगदानाविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार सह कार्यक्रमाधिकारी डॉ. रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंदांची उपस्थिती होती.

स्त्रियांवरील अत्याचाराप्रमाणेच पुरुषांवरील अत्याचारास प्रतिबंध करणाऱ्या कायद्यांची गरज_ अँड. शुभांगी गीत्ते

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयामध्ये आयोजित महिला तक्रार निवारण समितीच्या कार्यक्रमात बोलताना परळी न्यायालयातील एडवोकेट शुभांगी गीते ह्या बोलत होत्या. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ या विषयावर बोलताना त्यांनी सांगितले की आजच्या धावपळीच्या जगामध्ये महिलावर अन्याय अत्याचार होतात त्यांचा विविध माध्यमातून विविध पद्धतीने लैंगिक छळ होतो त्यास प्रतिबंध करणारे कायदे आहेत  तसेच आता परिस्थिती पुरुषांवर लैंगिक छळाची वेळ येण्याची देखील आली आहे त्यामुळे पुरुषांनाही आपले संरक्षण करण्यासाठी कायद्याने योग्य ती कलमे आणि उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी नोंदवले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर प्रा एस आर जोशी, प्रा अफीया उजम, प्रा. मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ राजपांगे यांनी मुला मुलींमध्ये होत असलेल्या मोबाईलच्या अतिवापराचा आणि त्याच्या दुरुपयोगाचा उल्लेख करून संस्कारी पिढी निर्माण करणे हे शिक्षकांचे व पालकांपुढील आव्हान असल्याचे मत नोंदविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. अर्

नवगण महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये भव्य क्रीडा स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी बीड , गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहेत. दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आज परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री उमाकांत कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ.एम जी राजपांगे हे होते तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी परळी चे नवनाथ सोनवणे, डॉ लालासाहेब घुमरे, योग प्रशिक्षक श्री कराड सर हे उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना पी आय श्री कस्तुरे साहेब यांनी विद्यार्थी जीवनामध्ये खेळाचे आणि मैदानावरील नातेसंबंधाचे महत्त्व सांगितले तर प्राचार्य राजपागे सर यांनी कोरोना नंतर आयोजित होत असलेल्या या आरोग्यवर्धक आणि निकोप शालेय जीवनाच्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व प्रतिपादन केले. परळी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा चे समन्वयक श्री संजय देशमुख यांच्या नियोजनात होत अ

नवगण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंद्रधनुष्य विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवामध्ये निवड

Image
परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयातील   चि. नामदेव विठ्ठल फड याची आंतर विद्यापीठ युवक महोत्सव साठी शास्त्रीय तालवाद्य या प्रकारासाठी निवड झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या इंद्रधनुष्य अंतर विद्यापीठ युवक महोत्सव 2022 2023 मध्ये संपन्न होत आहे. पखवाज वादनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून स्पर्धेसाठी नामदेव फड याची निवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये नवगण महाविद्यालयाच्या संगीत विभागास प्रथम पारितोषिक देखील प्राप्त झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कीर्तन भजन इत्यादी सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये आणि स्वतंत्र पखवाज सोलो वादनामध्येही नामदेव याने चांगली कसब दाखविली आहे. त्याच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे, संगीत विभागप्रमुख डॉ महेश दांडगे, प्रा. राहुल सोनवणे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन

परळीतील विद्यार्थिनीची औरंगाबाद विद्यापीठाच्या हॉलीबॉल आंतर विद्यापीठीय क्रीडा संघामध्ये निवड

Image
नवगण महाविद्यालय परळीची विद्यार्थिनी मोनिका जमदाडे हिची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलींच्या हॉलीबॉल संघामध्ये अंतर विद्यापीठ क्रीडा  स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. नवगण महाविद्यालयांमध्ये विविध क्रीडा प्रकारांकरिता मार्गदर्शन आणि नियमित सराव घेण्यात येतो. क्रीडांगणसह सर्व सुविधांनी संपन्न असलेल्या या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाच्या सुविधा पुरविण्यात येतात. याचेच फलित म्हणून विद्यापीठीय व राज्यस्तरीय संघामध्ये येथील विद्यार्थ्यांची निवड होते असे मत प्राचार्य डॉ एम.जी.राजपांगे यांनी यावेळी व्यक्त केले. कु.मोनिकाच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे क्रीडा विभाग प्रमुख डॉ.रवींद्र मचाले, डॉ. उध्दवराव मुळे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.

नवगण महाविद्यालयात सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळाची स्थापना

Image
परळी : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये समाजशास्त्र ,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र , इतिहास इत्यादी सामाजिक शास्त्रांचे अध्ययन अध्यापन होते. या विषयांमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनि त्यांच्या वाङ्मय मंडळाची अर्थातच सामाजिकशास्त्र मंडळाची आज प्रा. डी के आंधळे यांच्या प्रमुख   उपस्थितीमध्ये स्थापना केली. यावेळी बोलताना प्रा. आंधळे म्हणाले की सामाजिकशास्त्र मुळे जीवनविषयक कौशल्यांची समीक्षा आणि परीक्षा होते. साहित्यातील अभिव्यक्ती प्रमाणेच सामाजिक विचार आणि चिंतन व्यक्त करण्यासाठी सामाजिकशास्त्र मंडळाची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते. अभ्यास मंडळाच्या सचिवपदी  माने गोविंद दिलीपराव यांची तर  अध्यक्षपदी श्वेता जगदीशप्रसाद  दुबे यांची निवड करण्यात आली आहे . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. बबन झांजे यांनी केले तर आभार डॉ राजा आचार्य यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास सर्व सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक, विभागप्रमुख उपस्थित होते

नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ येथे वाणिज्य वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये पदवी व पदव्युत्तर स्तरावर वाणिज्य विषयासाठी  अभ्यासक्रम उपलब्ध असून आज डॉ राजकुमार जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली. यावेळी बोलताना डॉ राजकुमार जोशी यांनी जागतिकीकरणामुळे जगभरामध्ये व्यापार व संघटनांमध्ये झालेले बदल यांची चर्चा केली डिजिटल अॅप, सॉफ्ट स्कील, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी वाणिज्य व व्यापार पध्दती मध्ये झालेले बदल आणि ऑनलाईन व्यवहार याविषयी सविस्तर जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक डॉ अनुराधा चंद्रे यांनी केले तर  कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांनी केला. यावेळी बोलताना डॉ राजपांगे म्हणाले की आधुनिक काळामध्ये तंत्रस्नेही आणि ऑनलाइन व्यापार उदिमाचे शिक्षण नसेल तर अशिक्षित ठरण्याची शक्यता आहे. आभारप्रदर्शन डॉ राजकुमार आचार्य यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि बहुसंख्य प्राध्यापक वृंद उपस्थित होते.

स्वर्गीय केशर काकू आमच्या सावित्री _प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे

Image
नवगण महाविद्यालय परळी येथे गृहविज्ञान विभागाच्या वतीने स्वर्गीय सौ. केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि स्मरणार्थ  महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या  विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ राजपांगे हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की  काकूं चे तळागाळातील विद्यार्थिनींसाठी असलेली तळमळ,  विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी उभारलेल्या शाळा महाविद्यालय आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी असलेली त्यांची धोरणे ही सावित्रीबाई फुले यांच्या तत्वावर आधारित होती. त्यामुळेच आज ऊसतोड असलेल्या बीड जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्त्री शिक्षण, भारतीय स्त्री, स्त्रियांचे समाजातील स्थान यासारख्या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी  भरभरून प्रतिसाद दिला. उत्कृष्ट तीन निबंधांना बक्षीसे देण्यात आली. याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले आणि प्रोत्साहन

नवगण महाविद्यालयात लोकनेत्या स्व. केशरकाकू क्षीरसागर यांची पुण्यतिथी साजरी

Image
परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज बीडच्या माजी खासदार लोकनेत्या स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ एम.जी. राजपांगे यांनी काकूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी बोलताना डॉ रवींद्र मचाले यांनी केशरकाकू क्षीरसागर यांच्या राजकीय सामाजिक कार्याची माहिती सांगितली. मराठवाड्याच्या विकासात महिला खासदाराचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ राजाभाऊ धायगुडे यांनी व्यक्त केले. पुण्यतिथी कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते .

Whatsaap Connect QR code & Google pay, Phonepe payment Details

Image
  Vidyawarta is a platform for the interaction of the scholars of languages and social sciences. Through vidyawarta we wish to inspire students for research by publishing their articles, in print format.   Through quarterly Vidyawarta we expect to offer solutions to the various education related problems by inviting the opinions of thinkers and scholars. Multilingual Vidyawarta invites research papers in Marathi, Hindi. English languages, so that the scholars may enhance their knowledge without the barriers of language. The Vidyawarta aims at disseminating the knowledge in the field of various streams of   Education, Literature & Management and provides a forum for deliberations and exchange of knowledge among Scientist, Academicians, Researchers, Professionals, Industries and practitioners. The Vidyawarta encourages submission of theoretical and empirical result-based papers, case studies, research papers and notes, executive experience, sharing articles in the different

Research Journal Using Fonts : English Font, Hindi Font, Marathi Fonts for Typing

Image
  The Vidyawarta encourages submission of theoretical and empirical result-based papers, case studies, research papers and notes, executive experience, sharing articles in the different domains of science, technology and management related disciplines. Multilingual Vidyawarta invites research papers in Marathi, Hindi. English languages, so that the scholars may enhance their knowledge without the barriers of language.

Instructions For Writers and Research Scholars

Image
Welcomes full length research papers, short communications & reviews in all areas of Languages & Social Sciences.  

Multilingual Vidyawarta invites research papers in Marathi, Hindi. English languages

Image
 

ऑनलाइन ISBN पुस्तक प्रकाशनाची संधी

Image
Dear Author, If you wish to  publish any book with ISBN form Harshwardhan publication, Please send about details for proposed book. This from is avalible on our websit.   http://www.vidyawarta.com/01/?p=4930 Editor Dr. Bapu Gholap Beed(Maharashtra) vidyawarta@gmail.com 7588057695(Whatsapp)

पीअर रिव्हय़ू आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिका

Image
Vidyawarta & Printing Area both journals is not UGC listed OR Not included in CARE List. This Two journal is Peer reviewed, Refreed & Reputed journals. Both magezines published every month in printed format. Peer reviewed journals are now considered equivalent to UGC CARE listed journals in most of the universities in India and are also given marks for its API, promotion and new appointments.

गीतामृताचा प्रवाह : रामकृष्ण महाराज आणि वारकरी सांप्रदाय _ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

Image
हर्षवर्धन प्रकाशन, बीड (महाराष्ट्र) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या *गीतामृताचा   प्रवाह* ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न. काल दि.०९ मे २०२२ रोजी आळंदी येथे ' गीता अमृताचा प्रवाह रामकृष्ण महाराज व वारकरी संप्रदाय ' या विषयावरील संपादीत ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील अध्यात्मिक क्षेत्रातील चिंतनशील अभ्यासक गुरूवर्य ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,वारकरी संप्रदायाचे  चिंतनशील अभ्यासक तथा ग्रंथाचे कार्यकारी संपादक ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्री,गीताभवनचे विद्यमान अध्यक्ष बाबुरावजी केंद्रे साहेब,संपादक तथा प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. रामकृष्ण बदने व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा ग्रंथ निर्मितीसाठी लेखकासह ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. संत सज्जनांच्या संगतीत एक चांगली वैचारिक चर्चा आणि आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन करण्याची संधी हर्षवर्धन प्रकाशनाला दिली याबद्दल माननीय संपादक आणि ट्रस्ट यांचे आभार. प्रकाशक  हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा लि  बीड 9850203295 7588

पुस्तक प्रकाशनासाठी संपर्क

Image

publication solutions

Image

Government of india trademark registered research journal

Image

ISO certified journal

Image

seminar special issue publication 2021

Image