स्वर्गीय केशर काकू आमच्या सावित्री _प्राचार्य कॅप्टन डॉ राजपांगे

नवगण महाविद्यालय परळी येथे गृहविज्ञान विभागाच्या वतीने स्वर्गीय सौ. केशर काकू क्षीरसागर यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि स्मरणार्थ  महाविद्यालयीन विद्यार्थिनींच्या  विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य डॉ राजपांगे हे बोलत होते.पुढे बोलताना ते म्हणाले की  काकूं चे तळागाळातील विद्यार्थिनींसाठी असलेली तळमळ,  विद्यार्थिनींना शिक्षणाची संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांनी उभारलेल्या शाळा महाविद्यालय आणि महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी असलेली त्यांची धोरणे ही सावित्रीबाई फुले यांच्या तत्वावर आधारित होती. त्यामुळेच आज ऊसतोड असलेल्या बीड जिल्ह्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थीना शिक्षणाची संधी मिळाली आहे. त्यांच्या कार्यास अभिवादन करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये स्त्री शिक्षण, भारतीय स्त्री, स्त्रियांचे समाजातील स्थान यासारख्या विषयांवर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थिनींनी  भरभरून प्रतिसाद दिला. उत्कृष्ट तीन निबंधांना बक्षीसे देण्यात आली. याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये घेतलेल्या सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक करण्यात आले आणि प्रोत्साहन पर बक्षीसे देण्यात आली. निबंध स्पर्धेचे परीक्षण  प्रा. डॉ. घोलप, प्रा. सोनाली जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृह विज्ञान विभागाच्या प्रमुख  डॉ. वंदना फटाले  यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपांगे सर यांनी काकूंच्या कार्यास उजाळा दिला, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन  डॉ. उमाकांत वानखडे यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे