Posts

Showing posts from July, 2023

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

Image
बंकटस्वामी महाविद्यालय बीड चे उपप्राचार्य प्रा. बन्सी काळे हे आपल्या 33 वर्षाच्या सेवेनंतर 31 जुलै रोजी निवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या कार्याचा व स्वभावाचा परामर्श घेणारा विशेष लेख प्रा. बन्सी गणपतराव काळे आपल्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या 33 वर्षांमध्ये त्यांनी बंकटस्वामी महाविद्यालयामध्ये प्राध्यापक, पर्यवेक्षक आणि उपप्राचार्य पदावर आपली सेवा सचोटीने पूर्ण केली. मित्रहो वास्तविक बंकटस्वामी महाविद्यालयाचा आणि माझा तसा विशेष शैक्षणिक संबंध नाही. मी बलभीम महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो आणि आदरणीय डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी के एस के महाविद्यालय मध्ये मला नोकरी दिली. मात्र बंकटस्वामी मध्ये असणारे भाऊ हे माझे शालेय जीवनापासूनचे महाविद्यालय आहेत. ते आमचे विद्यापीठही आहेत. आज सेवानिवृत्तीच्या निमित्ताने मी त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीचा उहापोह करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने व उपस्थित असलेल्या सर्व नातेवाईकांच्या स्नेही जणांच्या वतीने नात्यातले भाऊ व्यक्त करतो. भाऊ या शब्दाला आपल्या संस्कृतीत आदर आहे. आपुलकी आहे. आपलेपणा आहे. आम्ही आदराने प्रा बी जी क

नवगण महाविद्यालयाच्या उपप्राचार्य पदी डॉ. महेश दाडगे यांची नियुक्ती

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये कार्यरत असणारे संगीत विभाग प्रमुख डॉ महेश शामराव दाडगे यांची नुकतीच संस्थेने उप प्राचार्य पदी नियुक्ती केली आहे. संगीत विषयांमध्ये यूजीसी नेट परीक्षा पास असणारे प्रोफेसर दाडगे हे गेल्या 18 वर्षापासून महाविद्यालयामध्ये कार्यरत असून वेगवेगळ्या समित्यांमध्ये त्यांनी उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल संस्थेचे मार्गदर्शक मा जयदत्त अण्णा क्षीरसागर, संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर, युवा नेते डॉ. योगेश क्षीरसागर, प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे यांच्यासह संस्था पदाधिकाऱ्यांनी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी इत्यादीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.