नवगण महाविद्यालयात तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न




परळी वैजनाथ :  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये भव्य क्रीडा स्पर्धा संपन्न होत असून या स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य पुणे , जिल्हा क्रीडा अधिकारी बीड , गटशिक्षणाधिकारी कार्यालय परळी वैजनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होत आहेत.
दिनांक 15 ते 17 नोव्हेंबर या कालावधीमध्ये संपन्न होत असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन आज परळी शहर पोलीस स्टेशनचे पीआय श्री उमाकांत कस्तुरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ.एम जी राजपांगे हे होते तर प्रमुख पाहुणे गटशिक्षणाधिकारी परळी चे नवनाथ सोनवणे, डॉ लालासाहेब घुमरे, योग प्रशिक्षक श्री कराड सर हे उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पी आय श्री कस्तुरे साहेब यांनी विद्यार्थी जीवनामध्ये खेळाचे आणि मैदानावरील नातेसंबंधाचे महत्त्व सांगितले तर प्राचार्य राजपागे सर यांनी कोरोना नंतर आयोजित होत असलेल्या या आरोग्यवर्धक आणि निकोप शालेय जीवनाच्या क्रीडा स्पर्धांचे महत्त्व प्रतिपादन केले.
परळी तालुका शालेय क्रीडा स्पर्धा चे समन्वयक श्री संजय देशमुख यांच्या नियोजनात होत असलेल्या या स्पर्धेमध्ये परळी तालुक्यातील विविध मराठी आणि इंग्रजी माध्यमातील शाळेतील संघ सहभागी झाले आहेत. नवगण महाविद्यालयाच्या मैदानामध्ये आज शालेय मैदानी स्पर्धा, खो खो , कबड्डी स्पर्धा विविध वयोगटातील आयोजित करण्यात आल्या. यामध्ये महाविद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मचाले , डॉ. उद्धवराव मुळे यांनी विविध परीक्षक आणि मैदानांची आखणी व नियोजनासाठी प्रयत्न केले. परळी तालुक्यातील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींमुळे मैदानावर चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी केले तर आभार श्री आरगडे सर यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे