नवगण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची इंद्रधनुष्य विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवामध्ये निवड


परळी वैजनाथ : येथील नवगण महाविद्यालयातील  
चि. नामदेव विठ्ठल फड याची आंतर विद्यापीठ युवक महोत्सव साठी शास्त्रीय तालवाद्य या प्रकारासाठी निवड झाली आहे.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे होणाऱ्या इंद्रधनुष्य अंतर विद्यापीठ युवक महोत्सव 2022 2023 मध्ये संपन्न होत आहे. पखवाज वादनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून स्पर्धेसाठी नामदेव फड याची निवड झालेली आहे. नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये नवगण महाविद्यालयाच्या संगीत विभागास प्रथम पारितोषिक देखील प्राप्त झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच कीर्तन भजन इत्यादी सांप्रदायिक कार्यक्रमामध्ये आणि स्वतंत्र पखवाज सोलो वादनामध्येही नामदेव याने चांगली कसब दाखविली आहे.
त्याच्या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शक जयदत्त अण्णा क्षीरसागर तसेच संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर , संस्थेच्या उपाध्यक्ष प्राचार्य डॉ . दीपाताई क्षीरसागर , युवा नेते डॉ योगेश क्षीरसागर , प्राचार्य डॉ .कॅप्टन एम.जी. राजपांगे, संगीत विभागप्रमुख डॉ महेश दांडगे, प्रा. राहुल सोनवणे व सर्व प्राध्यापक _ कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे