परळी येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

परळी वैजनाथ :  येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री शिवसेना नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. येथील नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमास बाळासाहेब देशमुख, नरेश हलगे यांची प्रमुख उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे हे होते.
यावेळी परळी येथील जिल्हा उप रुग्णालयामध्ये रुग्णांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फळ वाटप करण्यात आले तर स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालय अंबाजोगाई यांच्या वतीने महाविद्यालयात रक्तदान शिबिर घेण्यात आले. डॉ. सुजित तुमोड आणि त्यांच्यासोबत डॉ. लालासाहेब घुमरे, सय्यद मुस्ताक, यादव बी एस, शेख बाबा यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.
यावेळी बोलताना बाळासाहेब देशमुख यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये केलेल्या सामाजिक कार्यात रक्तदानाचे महत्त्व सांगितले तर श्री नरेश हलगे यांनी जयदत्त क्षीरसागर यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याची उंची त्यांच्या वैचारिक आणि विकासाभमुख निर्णयामध्ये असल्याचे मत व्यक्त केले.
प्राचार्य राजपांगे यांनी आपल्या एनसीसी कारकीर्दीतील आरोग्य विषयक व सामाजिक कार्याचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ राजाभाऊ धायगुडे यांनी केले तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ रवींद्र मचाले यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील हेल्थ सेंटर सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. यावेळी बहुतांश विद्यार्थी कार्यकर्ते आणि प्राध्यापकांनी यावेळी रक्तदान केले आणि माजी मंत्री जयदत्त अण्णा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे