नवगण महाविद्यालय परळी वैजनाथ न्याक चतुर्थ श्रृंखला तपासणीसाठी सज्ज

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय यूजीसीच्या निर्देशानुसार न्याकच्या चतुर्थ शृंखला तपासणीसाठी सज्ज झाले असून महाविद्यालयाच्या सर्व विभागांची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. 
चतुर्थ पुनर्मूल्यांकनासाठी नेक बेंगलोर यांनी नियुक्त केलेली टीम दिनांक 25 व 26 सप्टेंबर रोजी नवगण महाविद्यालय परळी येथे भेट देत असून उच्च शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता महाविद्यालयाने केली. नवगण शिक्षण संस्थेच्या पडताळणी समितीने तसेच संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर, संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ दीपाताई क्षीरसागर यांनी मार्गदर्शन करून सर्व बाबींची पूर्तता केल्याची खातरजमा केली आहे. नेक बेंगलोर यांनी नियुक्त केलेल्या पीयर टीम मध्ये 1. माननीय अध्यक्ष, प्रो. डॉ. जयचंद्रन आर., प्रोफेसर और निदेशक,भारतीय भाषा विद्यालय, केरल विश्वविद्यालय।
2. माननीय समन्वयक प्रो. डॉ. विश्वम्भर प्रसाद सती,
वरिष्ठ प्रोफेसर,भूगोल और संसाधन प्रबंधन विभाग आइजोल, मिजोरम।
3. आदरणीय सदस्य प्राचार्य डाॅ. तिरुचेल्वम चिन्नैयन, प्रधानाचार्य
नैना मोहम्मद कॉलेज ऑफ आर्ट्स एंड साइंसेज, अरनतांगी,तमिलनाडु.
इत्यादींची नियुक्ती केली असून संस्थेचे सर्व पदाधिकारी, परिसरातील सर्व शिक्षण प्रेमी, इतर संस्थांचे प्राचार्य यांनी प्राचार्य कॅप्टन डॉ एम.जी. राजपांगे यांच्यासह महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांना सदर मूल्यांकनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे