नवगण महाविद्यालयामध्ये मेरी माटी मेरी देश उपक्रम संपन्न

परळी वैजनाथ :  येथील नवगण कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 20 सप्टेंबर रोजी मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत अमृत कलश यामध्ये प्रत्येकाने मूठभर माती संकलित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपांगे हे होते त्याचप्रमाणे उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. महेश दाडगे यांची उपस्थिती होती.

मेरी माटी मेरा देश या उपक्रमांतर्गत प्रदेशातील विविध ठिकाणाहून मातीचे संकलन करून जिल्हास्तरावर एकत्रित केले जात आहे व तेथून राजधानी मध्ये संबंधित अमृत कलश पाठविण्यात येणार आहे. याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी माननीय डॉ  राजाभाऊ धायगुडे, डॉ. रवींद्र मचाले इत्यादींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी व प्राध्यापक यांची उपस्थिती होती. या उपक्रमाची ग्रीनिश बुक मध्ये नोंद होणार असून त्यामध्ये महाविद्यालयाने सहभाग नोंदविलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार