महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन नवीन पद्धतीनुसार, जून 2024 पासून होणार अंमलबजावणी.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - 2020 मध्ये नॅक, एन. बी. ए., एन. आय. आर. फ. अश्या सर्व  मूल्यांकन संस्थांच्या प्रक्रियेमध्ये समानता अथवा बदल करण्याचे प्रस्तावित होते, त्यामधील नॅकच्या अनुषंगाने गठीत इस्रो चे माजी अध्यक्ष डॉ. राधाकृष्णन समितीचा अहवाल केंद्रीय मंत्री मा. धर्मेंद्र प्रधान यांनी १६ जानेवारी २०२४ रोजी स्वीकारला असून, २७ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या नॅक च्या बैठकीत ही प्रक्रिया अंमलबजावणीच्या दृष्टीने चर्चा झाली आणि जून २०२४ पासून ही मूल्यांकन प्रक्रिया लागू करण्याचे ठरले. नवीन मूल्यांकनामध्ये आमुलाग्र बदल होणार असून, आत्ता अस्तित्वात असलेली आणि ज्या मुळे महाविद्यालयामध्ये निरर्थक स्पर्धा असायची अशी ग्रेड पद्धत (C ते A++) बंद होणार आहे, आता फक्त त्या महाविद्यालयाचे मूल्यांकन झाले अथवा नाही (बायनरी) एवढाच भाग असणार आहे. नॅक साठी माहिती सादर करण्याची प्रक्रिया सोपी करणेत आली असून, One Nation One Data या प्लॅटफॉर्म चा सदर मूल्यांकन प्रक्रियेमध्ये महत्वाचा भाग असणार आहे, महाविद्यालयांना नॅक साठी आवश्यक असणारा डाटा हा या प्लॅटफॉर्म वर ठेवावा लागणार आहे, जेणेकरून प्रत्यक्ष महाविद्यालयांना कमीत कमी भेट देण्याचा नॅक चा विचार असणार आहे किंवा अगदी कमी प्रमाणात डाटा तपासणी करण्यासाठी तज्ञ पाठविणेत येणार आहेत. जागतिक मूल्यांकन प्रक्रियेमध्ये भारतातील शैक्षणिक संस्थांची रँक वाढविण्याच्या दृष्टीने चालना देण्यासाठी Maturity- Based Graded Accreditation (Level1 -5) ची अंमलबजावणी पुढील वर्षापासून करण्याचे निश्चित केले आहे. एकंदरीतच येणाऱ्या तीन ते चार महिन्यात प्रक्रिया अंमलबजावणीची मार्गदर्शक तत्वे आणि parameters अस्तित्वात आल्यानंतर यामध्ये अधिक स्पष्टता येईल आणि महाविद्यालयांना प्रस्तावित प्रक्रियेला सामोरे जाणेस फारशी अडचण येणार नाही असे वाटते.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे