बामु'च्या कुलगुरुपदी डॉ विजय फुलारी, तर डॉ मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

*राज्यपालांकडून सीओईपी'च्या कुलगुरुपदी डॉ सुनील भिरुड यांची नियुक्ती*

 

राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील  डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. 

डॉ विजय फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे वरिष्ठ प्राध्यापक असून ते भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख होते. 

राज्यपालांनी नागपूर येथील सी पी अँड बेरार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मिलिंद अरविंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.  

राज्यपाल बैस यांनी डॉ सुनील गंगाधर भिरुड यांची शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे तंत्रज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली आहे.  डॉ भिरुड हे वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेत संगणक अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान विभागात प्राध्यापक पदावर काम करीत आहेत. 

सर्व कुलगुरुंची नियुक्ती ते पदभार स्वीकारल्याचे दिनांकापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा संबंधित कुलगुरु वयाची ६५ वर्षे पूर्ण करीपर्यंत - यापैकी जे अगोदर असेल त्या दिनांकापर्यंत - करण्यात आली आहे. 

**

*Dr Vijay Fulari appointed as Vice-Chancellor of BAMU; Dr Milind Barhate to be Vice-Chancellor of Sant Gadgebaba Amravati University*

*Governor appoints Dr. Sunil Bhirud as Vice-Chancellor of COEP Technological University*

Maharashtra Governor and Chancellor of state universities Ramesh Bais today appointed Dr. Vijay Janardan Fulari as the Vice-Chancellor of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University, Chhatrapati Sambhajinagar. Dr. Vijay Fulari is a Senior Professor and former Head of the Department of USIC & Physics, Shivaji University, Kolhapur .

The Governor has also appointed Dr. Milind Arvind Barhate, Principal of CP & Berar ES College, Nagpur as the Vice-Chancellor of Sant Gadgebaba Amravati University. Further, the Governor has appointed Dr. Sunil Gangadhar Bhirud as the Vice Chancellor of COEP Technological University, Pune.

Dr. Bhirud is working as a professor in the Department of Computer Engineering and Information Technology at Veermata Jijabai Technological Institute. All Vice Chancellors have been appointed for a tenure of five years from the date of assumption of office or till they attain the age of 65 years - whichever is earlier.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे