विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे

परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर मौजे नागापूर येथे 14 ते 20 फेब्रुवारी मध्ये संपन्न होत आहे त्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक परळी येथील रेडिओलॉजिस्ट डॉ अनिल कुमार घुगे हे बोलत होते
यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्री बाळासाहेब देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, नागापूरच्या सरपंच मंगलताई रमेश तोंडारे , संतोष सोळंके, मोहन सोळंके, परमेश्वर सोळंके, कुंडलिक सोळंके, कैलास सोळंके इत्यादींची उपस्थिती होती. 
यावेळी बोलताना डॉ. घुगे म्हणाले की विद्यार्थ्यांना चटपटीत खाण्याचे आणि कोल्ड्रिंक्स वगैरे रासायनिक पेय पिण्याचे व्यसन लागले आहे त्याचप्रमाणे मोबाईलचे व्यसन हे देखील आरोग्यास घातक आहे. यापासून विद्यार्थ्यांनी दूर राहिले पाहिजे. 
यावेळी नवगण महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी नागापूरच्या नागरिकांचा आणि नवगण महाविद्यालयाचा फार जुना संबंध असून महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी येथे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात काम करत आहेत हे सोदाहरण सांगून पूर्वीच्या काळी राष्ट्रीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय भरभरून आणि समृद्ध अशी होती मात्र आता विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यामध्ये कल कमी होत असून उपस्थिती देखील नगण्य असल्याची खंत व्यक्त केली तर उपप्राचार्य डॉ घुमरे यांनी एनएसएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी काही सामाजिक कार्यकर्ते आणि महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ राजाभाऊ धायगुडे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ रवींद्र मचाले यांनी केले. नागापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळा प्रांगणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास नागपूरचे ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी आणि नवगण महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांसह शिबिरार्थींनी उपस्थिती दर्शविली.

Comments

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन