नवगण महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन
परळी वैजनाथ :
नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नवगण महाविद्यालय परळी ग्रंथालय विभागातर्फे 15 फेब्रुवारी रोजी ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, ग्रंथपाल प्रा. लांडगे एस.जी., सर्व प्राध्यापक व विद्यार्थी आवर्जून पुस्तक प्रदर्शनात हजेरी लावली.
यावेळी बोलताना उपप्राचार्य डॉ घुमरे म्हणाले की विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे चरित्र आणि आत्मचरित्र यांचे वाचन केले पाहिजे म्हणजे त्यांच्या अनुभव संपन्न जीवनातून आपल्याला ज्ञान मिळते तसेच यावेळी विद्यावार्ता संशोधन पत्रिकेचे संपादक डॉ बापू घोलप यांच्या वतीने यावेळी विद्यार्थ्यांना संशोधन पत्रिकांचे मोफत वाटप करण्यात आले.
Comments
Post a Comment