डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळीत संगीत अभंगवाणी कार्यक्रम संपन्न
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये संगीत विभागाच्या वतीने अभंगवाणीचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ एल बी घुमरे , विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ महेश दाडगे इत्यादींची उपस्थिती होती.
साहित्य, संगीत इत्यादी सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी महत्त्वाचे योगदान दिलेले आहे त्यांना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी सुदर्शन शिंदे, गणेश नाथ पांचाळ, प्रा राहुल सोनवणे, प्रा महेश दाडगे, प्रा प्रकाश फड, प्रा. सोनाली जोशी इत्यादींनी विविध मराठी अभंग आणि गवळणींचे गायन करून अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ डी एस पुरी यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. बापूजी घोलप यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी आणि संगीत प्रेमी प्राध्यापकांची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment