डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त नवगण महाविद्यालयात महिला तक्रार निवारण समितीचा कार्यक्रम संपन्न
परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये संस्थेचे सचिव तथा बीड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून आज महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने महिलांच्या संरक्षणार्थ करण्यात आलेले कायदे या विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम.जी राजपांगे हे होते तर एडवोकेट शोभा लोमटे ह्या प्रमुख मार्गदर्शक होत्या. यावेळी बोलताना एडवोकेट लोमटे म्हणाल्या की कायदा स्त्री आणि पुरुष सर्वांना समान असतो तसेच आधुनिक काळामध्ये स्त्रियांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी कायद्याने सक्षम अशा प्रकारचे उपाययोजना केली आहे त्याची जाणीव जागृती महिला व मुलींमध्ये झाली पाहिजे. सौ कमल बरुडे यांनी लीनेस क्लब च्या वतीने करण्यात येणारे महिला विषयक कार्य आणि उपक्रम यांची माहिती दिली तर डॉ. राजपांगे यांनी पुरुषांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारासाठी ही महिला प्रमाणेच कायदे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व ततसंबंधी काही उदाहरणे दिली.यावेळी गयाताई कराड, ललिता पुजारी, उषा मोहिते, डॉ.वंदना फटाले ,डॉ. नयना शिरसाट इत्यादींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार प्रा जोशी मॅडम यांनी व्यक्त केले कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थिनींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment