डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन



परळी वैजनाथ : नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा बीड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी शहरांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. प्रा.शिल्पा मुंडे युवती तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परळी व सोफिया बाबू नंबरदार, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी परळी वैजनाथ इत्यादींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यामध्ये शहरातील अनेक मुलींनी सहभाग नोंदविला. आकर्षक रांगोळी सजावट, रंग योजना, सामाजिक संदेशाची मांडणी या आधारावर मुलींना योग्य ती पारितोषिके देण्यात आली. रांगोळी स्पर्धेच्या आयोजनामध्ये प्रोफेसर डॉ वंदना फटाले , उर्दू विभागाच्या प्रमुख प्रा. अफिया उजमा, प्रोफेसर डॉ अर्चना परदेशी, प्रा. सोनाली जोशी, प्रसिद्धीविभाग प्रमुख डॉ बापू घोलप, डॉ दयानंद कुरुडे इत्यादींनी परिश्रम घेतले तसेच नवगण महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा उप रुग्णालयांमध्ये रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य बाळासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ. मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. लालासाहेब घुमरे, वैद्यकीय अधीक्षक व रुग्णालयातील डॉक्टर यांच्यासह सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती तसेच वैद्यनाथ मंदिर देवस्थान परिसरामध्येही लोकांना फळांचे वाटप करण्यात आले. नवगण महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने डॉ अनुरथ चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन प्रश्नमंजुषाचे आयोजन करण्यात आले. डॉ रवींद्र मचाले व डॉ उद्धव मुळे यांनीही क्रीडाविषयक ऑनलाईन प्रश्नमंजुषा घेतली आणि डॉ उमाकांत वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विभागाच्या वतीने निवडणूक साक्षरता विषयक कार्यक्रम घेण्यात आला. प्रा. सुभाष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच संगीत विभागाचे प्रोफेसर महेश दाडगे, प्रा राहुल सोनवणे, प्रा. जोशी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अभंग गायनाची संधी उपलब्ध करून दिली व उत्कृष्ट असा संगीत अभंगवाणीचा कार्यक्रम सादर केला. राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने मौजे नागापूर येथे स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. डॉ राजाभाऊ धायगुडे व डॉ रवींद्र मचाले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता कार्यक्रमांमध्ये विविध विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. आज दिवसभर परळी शहरांमध्ये विविध कार्यकर्त्यांनी डॉ भारतभूषणजी क्षीरसागर यांना शुभेच्छा व्यक्त केल्या व त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

*वार्तांकन* 
डॉ बापू घोलप 
नवगण महाविद्यालय परळी

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १