नवगण महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ मधुकर राजपांगे, उपप्राचार्य डॉ. एल बी घुमरे इत्यादींसह कनिष्ठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. राजपांगे म्हणाले की पूर्व पिढीच्या अनुभवाचा  विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा व अभ्यासक्रमासोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करावी व नीती संपन्न जीवन जगावे. तर उपप्राचार्य डॉ घुमरे यांनी विद्यार्थ्यांची महाविद्यालयात होणारी उपस्थिती आणि उपक्रमशीलता वाढली पाहिजे अशा अपेक्षा व्यक्त केल्या तसेच यावेळी डॉ दयानंद कुरडे व प्रा वाघमारे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेख मुसाफिर, आरती वाघमारे, शेख अमीर, स्वामी या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बापू घोलप यांनी व्यक्त केले तर आभार प्रा. जोशी मॅडम यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन