थोर समाजसुधारक हेच आपले खरे मार्गदर्शक : श्री बाळासाहेब देशमुख

संत तुकडोजी महाराज , छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, ज्योतिराव फुले इत्यादींसारखे समाजसुधारक हेच आजही आजच्या काळामध्ये आपल्याला दिशादर्शक आणि मार्गदर्शक विचार पुरवितात असे मत बाळासाहेब देशमुख यांनी नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मौजे नागपिंपरी येथे व्यक्त केले.
नवगण महाविद्यालयाचे मौजे नागपिंपरी येथे सलग पाचव्या वर्षी राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर होत आहे याच्या उद्घाटन याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कॅप्टन डॉ.मधुकर राजपांगे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. राजकुमार यल्लावाड, श्री अंकुश मुंडे तसेच ग्रामसेवक रणजीत इंगोले, उपसरपंच लक्ष्मण रंजवे  प्रतिष्ठित नागरिक साहेबराव मुंडे इत्यादींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ यल्लावाड यांना थोर समाज पुरुषांचे विचार आपल्याला प्रेरणादायी ठरतात तसेच आज आपल्यासमोर दीपस्तंभ म्हणून आदर्श कोणाला ठेवावे आणि तरुणांनी कशी वाटचाल करावी यासंबंधी मार्गदर्शन केले. श्री अंकुश मुंडे यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य विद्यार्थी जीवनामध्ये व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले. समारोप करताना प्राचार्य डॉ राजपांगे म्हणाले की दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत आहे व पाण्याची गुणवत्ता देखील खराब झाली आहे पर्यावरणाचे संतुलन बिघडत आहे मात्र राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ग्राम सुधारण्याची आणि पर्यावरण रक्षणाचा संस्कार चांगल्या पद्धतीने होत आहे.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.
रवींद्र मचाले , प्रास्ताविक प्रा धायगुडे यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा माणिक चव्हाण यांनी व्यक्त केले. शिबिरामध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग घेतलेला आहे.

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे