सुजान पिढीच्या उभारणीसाठी गर्भसंस्कार महत्त्वाचे- वैजनाथ सोळंके

सुजाण आणि सुज्ञ पिढीच्या निर्मितीसाठी गर्भसंस्कार अतिशय महत्त्वाचे आहेत कारण त्यांच्या स्वप्नांना आकार तेथूनच येतो असे मत ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके यांनी नवगण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोप प्रसंगी नागपिंपरी येथे व्यक्त केले.

राष्ट्रीय सेवा योजना समारोपारंभ मौजे नागपिंपरी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्री गोपाळ आंधळे माजी शिक्षण सभापती नगरपरिषद परळी वैजनाथ तसेच श्री वैजनाथ सोळंके शिवसेना जेष्ठ नेते परळी वैजनाथ, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कॅप्टन डॉ.मधुकर राजपांगे , मौजे नागपिंपरी सरपंच सौ सविताताई अंकुश मुंडे यांचे सासरे श्रीहरी बाबुराव मुंडे तसेच उपसरपंच लक्ष्मण काशिनाथ रंजवे, ज्येष्ठ नागरिक श्री अच्युतराव मुंडे पत्रकार श्री महादेव गीते इत्यादींची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना गोपाळ आंधळे यांनी असे सांगितले आजकाल नोकरी ही दुरापास्त झाली आहे. तसेच लोकांना कामाचा ताण जास्त झाला आहे व त्याचप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचा मूळ उद्देश सांगितला व वाल्या कोळी ची गोष्ट सांगितली तसेच मनुष्याच्या आयुष्यामध्ये संगत साथ सोबत चांगली असावी लागते असे सांगितले. त्याचप्रमाणे वैजनाथ सोळंकी यांनी असे सांगितले नवगण महाविद्यालय गेली पाच वर्षे राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून मौजे नागपिंपरी येथे श्रमदान शिबिर च्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छतेची कामे इतर कामे करत आहे तसेच परिस्थिती आपणाला शिकवत असते त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे व राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा यांनी स्वच्छतेची सुरुवात स्वतःपासून केली आणि जगाच्या कल्याणासाठी कार्य केले . ज्येष्ठ नागरिक अच्युतराव मुंडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आमच्या गावामध्ये आपले नवगण महाविद्यालय हे पाच वर्षापासून सातत्याने राष्ट्रीय सेवा योजना माध्यमातून काम करत आहे. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. राजपांगे यांनी गेली पाच वर्षे सातत्याने आमचं महाविद्यालय या गावांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विविध काम करत आहे या कामांमध्ये मोजे नागपिंपरी येथील नागरिकांनी भरभरून असा प्रतिसाद दिलेला आहे व त्यामुळेच आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम यशस्वी करू शकलो असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. रवींद्र मचाले यांनी केले तर प्रास्ताविक व आभार प्रा. धायगुडे यांनी केले या राष्ट्रीय सेवा योजना समारोप कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच प्राध्यापक प्राध्यापिका व समस्त मौजे नागपिंपरी येथील गावकरी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन