क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयांमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी. राजपांगे यांची उपस्थिती होती.

यावेळी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवन व कार्य विषयक विविध उपक्रम घेण्यात आले. सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसह प्राध्यापक वृंदांनी
 त्यांना अभिवादन केले. यावेळी बोलताना डॉ राजपांगे म्हणाले की महापुरुषांचे विचार केवळ पुस्तकांमध्ये किंवा इतिहासामध्ये उल्लेखनीय राहता कामाचे नाहीत तर ते आपण आज आचरणात आणले पाहिजेत त्याचे वाचन आणि उजळणी केली पाहिजे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ धायगुडे यांनी व आभार डॉ मचाले यांनी व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

सूत्रसंचालन कसे करावे भाग १

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन