गीतामृताचा प्रवाह : रामकृष्ण महाराज आणि वारकरी सांप्रदाय _ पुस्तकाचा प्रकाशन समारंभ संपन्न

हर्षवर्धन प्रकाशन, बीड (महाराष्ट्र) यांच्या द्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या *गीतामृताचा प्रवाह* ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न. काल दि.०९ मे २०२२ रोजी आळंदी येथे ' गीता अमृताचा प्रवाह रामकृष्ण महाराज व वारकरी संप्रदाय ' या विषयावरील संपादीत ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्रातील अध्यात्मिक क्षेत्रातील चिंतनशील अभ्यासक गुरूवर्य ह.भ.प.चंद्रशेखर महाराज देगलूरकर, नांदेडचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर,वारकरी संप्रदायाचे चिंतनशील अभ्यासक तथा ग्रंथाचे कार्यकारी संपादक ह.भ.प.तुकाराम महाराज मुंडे शास्री,गीताभवनचे विद्यमान अध्यक्ष बाबुरावजी केंद्रे साहेब,संपादक तथा प्रसिद्ध वक्ते प्रा.डॉ. रामकृष्ण बदने व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. हा ग्रंथ निर्मितीसाठी लेखकासह ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. संत सज्जनांच्या संगतीत एक चांगली वैचारिक चर्चा आणि आध्यात्मिक ग्रंथाचे प्रकाशन करण्याची संधी हर्षवर्धन प्रकाशनाला दिली याबद्दल माननीय संपादक आणि ट्रस्ट यांचे आभार. प्रकाशक हर्षवर्धन पब्लिकेशन प्रा लि बीड...