नवगण महाविद्यालयात व्यसनमुक्ती व शिष्यवृत्ती योजना मार्गदर्शन शिबिर संपन्न

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभाग समाज कल्याण बीड यांच्या संयुक्त विद्यमाने समान संधी केंद्रामार्फत नशामुक्त भारत अभियान मध्ये हे शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य कॅप्टन डॉ एम जी राजपांगे हे होते तर समन्वयक डॉ.आर डी आचार्य व सहाय्यक डॉ. ए एम चंद्रे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आचार्य यांनी केले व सामाजिक न्याय, समता पर्व, समान संधी याविषयी माहिती सांगितली तर डॉ. राजपांगे यांनी विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार आणि जातीनिहाय विविध शिष्यवृत्ती योजनांची माहिती सांगितली. या वेगवेगळ्या शिष्यवृत्तीच्या लाभातून विद्यार्थ्यांनी शिक्षणामध्ये प्रगती करावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ एम चंद्रे यांनी केले कार्यक्रमास विद्यार्थी आणि प्राध्यापक वृंद उपस्थित होते.