नवगण महाविद्यालयात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

परळी वैजनाथ : येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जयंतीनिमित्त मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य कॅप्टन डॉ. एम.जी राजपांगे होते तर विवेकानंद महाविद्यालय परळी, मराठी विभागाचे प्रा. संकेत हंडीबाग यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्ताविक प्रा धायगुडे यांनी केले तर केदार सारडा याने सूत्रसंचालन केले. मराठी भाषेची परंपरा समृद्ध आणि संपन्न आहे आजही तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन युक्ती शिकून आपण भाषेचा प्रभावीपणे जगभरामध्ये वापर करू शकतो असे मत प्रा हंडीबाग यांनी व्यक्त केले तर प्राचार्य डॉ राजपांगे यांनी मराठी भाषेतील सर्वश्रेष्ठ साहित्य वाचून समाजाला मार्गदर्शन होत असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी संगीत विभागाच्या वतीने प्रा एस आर जोशी व डॉ बापू घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली कु श्वेता दुबे व कु मोगरे यांनी मराठी आयटीत बोलूया हे गीत सादर केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. लालासाहेब घुमरे यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचा समारोप डॉ. ...