TAIT 2023 शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची तयारी कशी कराल ? जाणून घ्या अभ्यासक्रम व संदर्भ पुस्तके

         महाराष्ट्र शासनाने पारदर्शक व मानवी हस्तक्षेप रहित शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यंदा दुसरी TAIT 2023 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. यावेळी IBPS कंपनी कडून "शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी"  घेतली जाणार असल्याने परीक्षेतील प्रश्नांची कठिण्यपातळी अधिक असण्याची शक्यता आहे.  या परीक्षेसाठी पहिली ते बारावी वर्गांसाठी शिक्षक होण्यासाठी समान अभ्यासक्रम आहे. सदर लेखात TAIT परीक्षेचे स्वरूप, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम निहाय संदर्भ पुस्तके अशी महत्वपूर्ण माहिती दिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी सदर लेख पूर्ण वाचावा. परीक्षा अर्ज भरतांना  वेबसाइटवरील https://www.mscepune.in/# परीक्षेशी संबंधित माहिती पाहून  विचारपूर्वक अर्ज भरावा.

   *TAIT 2023 परीक्षा शुल्क*
1.खुला प्रवर्ग (अराखीव) - 950 रुपये
2.मागासवर्गीय/ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक /अनाथ / दिव्यांग उमेदवार - 850 रुपये

        *या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी पहिली ते आठवी मधील इयत्ता 1 ते 5 वर्गांसाठी डी.एड + टीईटी पेपर एक  आणि 6 ते 8 वर्गांसाठी पदवी + डी. एड किंवा बी.एड.+ टीईटी पेपर दोन असलेले शिक्षक पाञ आहेत.* 

         तर 9 वी व 10 वी वर्गासाठी बी.एड.  असलेले शिक्षक पात्र आहेत. आणि 11वी व 12 वी वर्गासाठी एम.ए./एम.एस्सी./एम.कॉम. आणि बी.एड. असणारे शिक्षक पात्र आहेत. *9 ते 12 या वर्गासाठी अर्ज करण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची आवश्यकता नाही.*
          प्रस्तुत परीक्षा ऑनलाइन होणार असून 2 तासात 200 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. साधारणपणे प्रत्येक प्रश्न सोडविण्यासाठी 36 सेकंद मिळणार आहेत.
         *परीक्षेसाठी इंग्रजी, मराठी व उर्दू माध्यम असून अर्ज भरतांना माध्यमाची निवड करावयाची आहे.*
         *सदर परीक्षा ही विषय ज्ञानावर होणार नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी विशिष्ट स्तर मर्यादा असणार नाही.*
           *प्रस्तुत परिक्षेचा अभ्यासक्रम हा शिक्षक अभियोग्यता(120 गुण)आणि बुद्धिमत्ता चाचणी(80 गुण)अशा दोन विभागात आहे.*
      शिक्षक अभियोग्यता घटकांतर्गत गणितीय क्षमता, तार्किक क्षमता, वेग व अचूकता, इंग्रजी व मराठी भाषिक क्षमता, अवकाशीय क्षमता, शिक्षक अभियोग्यता- कल, आवड, व्यक्तिमत्व, समायोजन हे घटक समाविष्ट आहेत.
         तर बुद्धिमत्ता चाचणी घटकांतर्गत आकलन, समसंबंध, क्रमश्रेणी, कुट प्रश्न, सांकेतिक भाषा, लयबद्ध मांडणी या घटकांचा समावेश आहे.

*#शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 वेळापत्रक#*

१. परीक्षा अर्ज भरणे - 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
२. ऑनलाइन परीक्षा - 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023
३.प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढणे- 15 फेब्रुवारी 2023 पासून उपलब्ध होतील.

*# TAIT 2023 अभ्यासक्रम व  महत्वपूर्ण अभ्यास संदर्भ#*

*■ TAIT संपूर्ण अभ्यासक्रम तयारीसाठी उपयुक्त संदर्भ*
*१. समग्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी - के सागर*
*२. संपूर्ण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी - डॉ.शशिकांत अन्नदाते*
   
*■ TAIT अभ्यासक्रम घटकनिहाय महत्वपूर्ण संदर्भ*

★ बुद्धिमत्ता चाचणी - सचिन ढवळे/के'सागर/नितीन महाले/सतीश वसे/पंढरीनाथ राणे/ अनिल अंकलगी/ सुजित पवार यापैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही दोन पुस्तके अभ्यासा.

★अंकगणित - सचिन ढवळे/के सागर/प्रमोद हुमने/नितीन महाले/सतीश वसे/ पंढरीनाथ राणे, लोळे यापैकी तुम्हाला आवडणारी कोणतीही 2 पुस्तके अभ्यासा.

*★ शिक्षक अभियोग्यता व मानसशास्त्रातील कल, आवड, समायोजन व व्यक्तिमत्व इत्यादी घटक*

★ संपूर्ण शिक्षक अभियोग्यता, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र -  डॉ शशिकांत अन्नदाते सर (मानसशास्त्र घटकातील विविध संकल्पना,परीक्षाभिमुख तयारीसाठी व भरपूर वस्तुनिष्ठ प्रश्न सरावासाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ)

★ शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र - डॉ.ह.ना.जगताप सर

★ शिक्षक अभियोग्यता विशेष तयारी - स्वाती शेटे (दुसरी आवृत्ती)

★ भाषिक क्षमता मराठी- मो.रा.वाळिंबे/के सागर/ बाळासाहेब शिंदे/डॉ.आशालता गुट्टे यापैकी कोणतेही एक पुस्तक अभ्यासा.

★भाषिक क्षमता इंग्रजी - के सागर/ बाळासाहेब शिंदे/सुदेश वेळापुरे/ एम.जे.शेख यापैकी कोणतेही एक पुस्तक अभ्यासा

★ सामान्यज्ञान -  के'सागर/ विनायक घायाळ/नवनीत यापैकी कोणतेही एक पुस्तक अभ्यासावे.

★ TAIT मागील ऑनलाइन प्रश्नपत्रिकेसाठी विनायक घायाळ / ऑनलाइन मागील प्रश्नपत्रिका असलेले कोणतेही एक पुस्तक अभ्यासा.

★ TAIT प्रश्नपत्रिका सरावासाठी स्वाती शेटे यांचे "TAIT 7 सराव प्रश्नपत्रिका" हे पुस्तक उपयुक्त ठरेल.

         *परीक्षेसाठी उपलब्ध वेळेचा सदुपयोग करून मनापासून अभ्यास करा.परीक्षेत यशस्वी होण्यासाठी हार्दिक शुभेच्छा*
         *Best of Luck*

*प्रत्येक डी.एड.,बी.एड. व एम.एड. पदवी असणाऱ्या विद्यार्थ्यांना सदर माहिती शेअर करावी ही विनंती*

Comments

Popular posts from this blog

भाऊ : नात्यागोत्यांचे समन्वयक

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे