शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये
*शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये* प्राचीन काळापासून शिकणे अणि शिकवण्याचे कार्य चालत आलेले आहे. प्राचीन काळात शिक्षकाला अत्यत उच्च स्थान होते. शिक्षकाला ईश्वरासमान मानले गेले होते. शिक्षकांनी आपल्या शिष्यांना बौद्धिक योग्यतेच्या विशिष्ट मानदंडापर्यन्त पोहचवावे अशी अपेक्षा केली जाई. शिष्य आपल्या शिक्षकाचेच प्रतिक्वि असतो. म्हणूनच शिक्षकाचे आचरण आणि चारित्र्य श्रेष्ठ दर्जाचे असे. आपल्या कर्तव्यात ते सतत जागरूक असत. आदर्श शिक्षक हा ज्ञानपिपासू असे. पण शिक्षकाचे कार्य प्रामुख्याने धर्माचा उपदेश हेच असे. पाठ्यांश्याचे वाचन, मनन, चिंतन आणि पाठांतरला प्राधान्य असे. आजच्या सतत बदलत्या समाजात शिक्षकाचे महत्त्व खूपच वाढले आहे. मुला-मुलींचा केवळ मानसिक विकास करणे इतके मर्यादित कार्य शिक्षकाचे आज नाही. मुला-मुर्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण, सर्वस्पर्शी, समतोल असा विकास घडवून आणावयाचा आहे. शारीरिक, नैतिक, भावनात्मक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक अंगांनी मुला-मुलींचा विकास घडवायचा आहे. त्यांच्यात सामाजिक कौशल्ये निर्माण करावयाची आहेत. समाजाचा जवाबदार घटक आणि राष्ट्राचे न...