शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये


*शिक्षकांसाठी काही आवश्यक गुणवैशिष्ट्ये* 
प्राचीन काळापासून शिकणे अणि शिकवण्याचे कार्य चालत आलेले आहे. प्राचीन काळात शिक्षकाला अत्यत उच्च स्थान होते. शिक्षकाला ईश्वरासमान मानले गेले होते. शिक्षकांनी आपल्या शिष्यांना बौद्धिक योग्यतेच्या विशिष्ट मानदंडापर्यन्त पोहचवावे अशी अपेक्षा केली जाई. शिष्य आपल्या शिक्षकाचेच प्रतिक्वि असतो. म्हणूनच शिक्षकाचे आचरण आणि चारित्र्य श्रेष्ठ दर्जाचे असे. आपल्या कर्तव्यात ते सतत जागरूक असत. आदर्श शिक्षक हा ज्ञानपिपासू असे. पण शिक्षकाचे कार्य प्रामुख्याने धर्माचा उपदेश हेच असे. पाठ्यांश्याचे वाचन, मनन, चिंतन आणि पाठांतरला प्राधान्य असे.
आजच्या सतत बदलत्या समाजात शिक्षकाचे महत्त्व खूपच वाढले आहे. मुला-मुलींचा केवळ मानसिक विकास करणे इतके मर्यादित कार्य शिक्षकाचे आज नाही. मुला-मुर्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण, सर्वस्पर्शी, समतोल असा विकास घडवून आणावयाचा आहे. शारीरिक, नैतिक, भावनात्मक, सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक अंगांनी मुला-मुलींचा विकास घडवायचा आहे. त्यांच्यात सामाजिक कौशल्ये निर्माण करावयाची आहेत. समाजाचा जवाबदार घटक आणि राष्ट्राचे नागरीक म्हणून त्यांचा आकार घडवायचा आहे. म्हणूनच आजच्या काळातही शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
राष्ट्राच्या बौद्धिक विकासात शिक्षकांचा जेवढा वाटा आहे तितका समाजातील कोणत्याही वर्गाचा नाही. राष्ट्राचा सांस्कृतिक स्तर किती उंच आहे, याच्या मोजमापाची एक कसोटी आहे. ती म्हणजे त्या राष्ट्रातील शिक्षकांना त्या समाजात कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे? त्यांना किती प्रतिष्ठा मिळत आहे ? आपल्या राष्ट्रात प्राचीन काळाइतका मानसन्मान आज शिक्षकाला नाही, पण युरोपातील राष्ट्रांमध्ये शिक्षकांकडे बघण्याची विशिष्ट आदराची दृष्टी आहे. आपल्याकडे स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षकांनी आपले नेतृत्त्व बरेचसे गमावले आहे ही वस्तुस्थिती आहे. आदर्शवादाचा सार्वत्रिक -हास, आर्थिक समस्या आणि शिक्षणपद्धतीतील दोप ही त्याची काही कारणेही आहेत.
अध्यापनाचे कौशल्य मात्र बव्हंशी शिक्षकांवरच अवलंबून आहे. समतोल असे व्यक्तिमत्वच अध्यापनकार्यात यशस्वी होते. शिक्षकाचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व हेच अध्यापनाचे अत्यंत आवश्यक असे मूल तत्त्व आहे. शिक्षकाचा व्यासंग, कौशल्य, त्याचे सर्वसाधारण व्यक्तिमत्व, जीवन आणि चारित्र्य यावरच अध्यापनाचे यश अवलंबून आहे. म्हणूनच शिक्षक हा शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वपूर्ण भाग आहे. अभ्यासक्रम, व्यवस्थापन, शैक्षणिक साहित्य ही शिक्षण व्यवस्थेतील महत्वाची अंगे आहेत. पण त्या सर्व बाबी निर्जीव त्या सचीव होता, शिक्षकांच्या त्याच्या संजीव व्यक्तिमत्याने म्हणूनच शिकणे आणि किरिया शिक्षकांचे स्थान महत्वपूर्ण आहे.
अध्यापनप्रक्रियेत शिक्षकांची उपस्थिती आवश्यक आहे. बालक आणि पाठ्वांश यांच्यात आंतरक्रिया पज्जूम क्लारा शिक्षक हाच पटक आहे. शिक्षकाच्या अभावी अध्यापनाची प्रक्रिया थांबून राहते.
आजचा काळ अतिशय गतिमान झाला आहे. सामाजिक व्यामिश्रता वाढत आहे. आर्थिक अडचणी तर आहेत. अर्थप्रधानता समाजाचे व्यवच्छेदक लक्षण होऊ पहात आहे. आईवडील आपापल्या उद्योग व्यवसाय-नौकरीत आहेत. आपल्या मुलामुलींना स्वतः च शिक्षण देण्याइतका वेळ त्यांच्याजवळ नाही. आपल्या मुलामुलींचा कौशल्यपूर्ण विकास करू शकण्याइतके ज्ञानही अनेक पालकांच्याजवळ नाही. विशेषतः बालकांचे
समाजीकरण घडवून आणणे आणि त्यांचा सामाजिक विकास साधणे पालकांना शक्य नाही. म्हणूनच आपल्या वाढत्या मुला-मुलीच्या सर्वस्पर्शी विकासाच्या कार्याचा भार आपण शिक्षकांवर टाकतो. शिक्षक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभावाद्वारे हे कार्य करतात.
अध्यापनव्यवसाय हा दुसऱ्या कोणत्याही व्यवसायापेक्षा अधिक जबाबदार आणि गौरवपूर्ण असा व्यवसाय आहे. हा एक अत्यंत उदात्त व्यवसाय आहे. मानवी इतिहासात सर्वच काळात श्रेष्ठ विभूतींनी हा व्यवसाय स्वीकारला.
आजच्या काळात या व्यवसायाचे श्रेष्ठत्व जपण्यासाठी शिक्षकांनी काही गुण आत्मसात करायला हवेत.
 *(१) निःपक्षपाती वृत्ती :* 
शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य निःपक्षपाती वृत्तीने करायला हवे. शिक्षण आता झोपडपट्टीपर्यंत पोहोचले आहे. समाजातील विविध स्तरांतील विद्यार्थी शाळेत असतात. समाजाचे आर्थिक प्रतिविंव शाळेत उमटते. म्हणूनच शिक्षकाजवळ समान दृष्टी असणे आवश्यक आहे. वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याला आत्म-आविष्काराचो संधी मिळाली पाहिजे. काही विद्यार्थ्यांना अनुकूल वागणूक तर, काहींवर अन्याय अशामुळे शिक्षकांच्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये असंतोपाची भावना निर्माण होते. अनाठायी शिक्षा करणे, काही विद्यार्थ्यांचे ऐकून इतरांना शिक्षा देणे हे प्रकार योग्य नाहीत. विद्यार्थ्यांवरील शिक्षकांचा प्रभाव जर कशाने कमी होत असेल तर त्यांच्या असहिष्णु वागण्यानेच. पक्षपात, अन्याय करणाऱ्या शिक्षकांवरचा विद्यार्थ्यांचा विश्वास उडतो. शिक्षक न्यायी नाहीत, असे एकदा विद्यार्थ्यांचे मत झाले म्हणजे शिक्षक केव्हा कसे वागतील याबद्दल तो ठाम सांगू शकत नाही. म्हणूनच शिक्षकांचे जीवनात निःपक्षपाती वृत्तीला अधिक महत्त्व आहे.
 *(२) मानसशाखाचे ज्ञान :* 
बालकेन्द्रीत अध्यापन पद्धतीचा पुरस्कार हे आधुनिक शैक्षणिक सूत्र आहे. छडीचा वापर त्याज्य ठरला आहे. हुशार विद्यार्थी आपल्या पुस्तकांचा अभ्यास जितका काळजीपूर्वक करतात त्याचप्रमाणे शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वभावाचा काळजीपूर्वक अभ्यास करायला हवा. सारी शिक्षणप्रक्रिया मानसशास्त्रमय आहे. विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक उद्दिष्टे, अभ्यासक्रम, अध्यापनपद्धती, पाठ्यपुस्तकांची रचना अशा शैक्षणिक बाबी 
दिसतात, व्यकिभेद असतात, प्रत्येकाच्या शिक्षकांना मानप्रशाखाच्या अभ्यासाने येते. अधिक वेगवेगळे आलात, याची जाणीव
 *(३) विद्यार्थ्यांच्या जिज्ञासा आणि अभिरूचीचे ज्ञान :* 
आजच्या काळात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके शिकविणे हेच शिक्षकांचे कार्य नाही, विद्यायल्या व्यक्तिमत्वाचा संपूर्ण विकास साधावयाचा आहे. विद्यार्थ्यांच्या मूलप्रवृती, रूचीअरुची आणि इच्छा-आकांक्षा, जिज्ञासा यांचे संपूर्ण ज्ञान शिक्षकाला हवे. या ज्ञानाशिवाय शिक्षक आपले अध्यापन-कार्य यशस्वी करू शकणार नाही,
 *(४) प्रभावी व्यक्तिमत्त्व :* 
शिक्षक होणे ही एका व्यवसायाची स्वीकृती आहे. अध्यापन व्यवसायातील शिक्षक या घटकाजवळ किमान चांगले व्यक्तिमत्त्व असणे आवश्यक आहे. प्रत्येक व्यवसायाच्या काही मागण्या असतात. भारदस्त व्यक्तिमत्व ही अध्यापन व्यवसायाची मागणी आहे. आपल्या जुन्या पिढीतील शिक्षकांनी आपल्या नैसर्गिक व्यक्तिमत्वातील कमतरता दूर करून भारदस्तपणा आणला होता. त्यांची राहणी स्वच्छ, नीटनेटकी, ऐटदार होती. अशा शिक्षकांनी अध्यापनाचे यशस्वी कार्य केलेले आहे. योग्य उंची, योग्य आवाज, योग्य भरीखकृती शिक्षकाला आवश्यक आहे. आपल्या व्यक्तिमत्यातील (Individuality) उणीव भरून काढून आपले व्यक्तिमत्व (Personality) भारदस्त, प्रभावी करणे हे आवश्यक आहे. दुर्दैवाने आजच्या सर्व स्तरातील शिक्षकांचे याकडे दुर्लक्ष आहे. शिक्षकांच्या वागण्या-बोलण्यात एक प्रकारची जिवंत सजीवता हवी. शिक्षकांच्या चांगल्या-वाईट वागण्याचा गहिरा प्रभाव विद्यार्थ्यांवर पडत असतो. शिक्षकांना आदर्श मानून ते त्यांचे अनुकरण करीत असतात. शिक्षकांची रूची अथवा अरुची हीच विद्यार्थ्यांची रूची अथवा अरूची बनते. अध्यापन ही एक जिवंत आंतरक्रिया आहे. म्हणूनच आपले व्यक्तिमत्व प्रभावी करण्याचा प्रयत्न शिक्षकांनी करावा.
 *(५) उत्साह :* 
चांगला शिक्षक आपले प्रत्येक कार्य उत्साही वृत्तीने करीत असतो. निरुत्साही शिक्षकाची सारीच कामे मागे पडलेली, अपूर्ण पडलेली असतात. म्हणूनच यशस्वी शिक्षकाचे जीवनात उत्साह ओतप्रोत भरलेला दिसतो. अध्यापन ही द्विविध प्रक्रिया आहे. अध्यापनाद्वारे विद्यार्थी घडवायचे आहेत. निराश, अनुत्साही शिक्षक विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊ शकत नही. विद्यार्थ्यांत स्फूर्ती, जोश निर्माण करू शकत नाही. शिक्षकांत जर चैतन्या असेल तरच ते विद्यार्थ्यांत परिवर्तित होईल. शिक्षक हा चैतन्याचा निधी असावयाला हवा. उत्साहाचा झर त्याच्या जीवनात सतत वाहत असायला हवा. तरच तो चैतन्यमय पिढी निर्माण करू शकेल.
 *(६) अध्यापनकार्याची आवड :* 
शिक्षणाचा प्रसार खूप झाला. ब्रिटीश शिक्षणपध्दतीच्या बंदिस्त आराखड्यातून आजही आपली सुटक झालेली नाही. परंपरागतरीत्या पदव्या देणारेच आपले शिक्षण आजही आहे. ज्या गतीने आधुनिक जीव
 परिवर्तनाची सामाजिक चळवळ
बहुमुखी झालेले आहे त्या गतीने आपले शिक्षण बहुमुखी झालेले नाही. विविध गजनवीन कौशल्ये आत्मसात केलेल्या तरुणांची चणचण एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला परंपरागत विद्यापीठीय शिक्षणाच्या पदव्या घेतलेल्या तरुणांची प्रचंड संख्या. यामुळे ज्याला शिक्षण व्यवसायात रूची नाही, अशाही असंख्य तरूणांचा भरणा या व्यवसायात गेल्या पंचवीस वर्षात झाला आहे. हे शिक्षक केवळ पाठ्या टाकतात. त्यांना अध्यापनात ना रस ना आनंद, ना रूची ना आबद्ध 
या परिस्थितीमुळे अध्यापनाचा दर्जा घसरतो आहे. मारूनमुटकून गरज म्हणून जरी या व्यवसायात प्रवेश केलेला असला तरी व्यवसायाशी प्रामाणिक राहण्यासाठी आवड निर्माण केली पाहिजे, अध्यापनाबद्दल आत्मीयता वाढविली पाहिजे. वर्गात निराश मनाने, उदासीनतेच्या भावनेने शिक्षक प्रवेश करतात. आणि व्यवसायाबद्दल विपरित उद्गार काढतात. हे चित्र नवी पिढी निर्माण करण्याच्या दृष्टीने घातक आहे. हा एक पवित्र व्यवसाय आहे. केवळ आर्थिक दृष्टीनेसुद्धा पाहून चालणार नाही. म्हणून शिक्षकांच्यात अध्यापनाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे.
 *(७) प्रेम आणि सहकाराची भावना :* 
शिक्षकाच्या जीवनात प्रेम आणि सहकाराच्या भावनेची नितांत आवश्यकता आहे. आपले अध्यापन हेतुपूर्ण उपकारक, फलदायक आणि सृजनशील व्हावे असेच प्रत्येक शिक्षकाला वाटायला हवे. त्यासाठी शिक्षकाच्या जीवनात प्रेम आणि सहानुभूती हवी. विद्यार्थ्यांना सतत धाकात ठेवणारा शिक्षक यशस्वी शिक्षक होऊ शकणार नाही. आपल्या मुलांवर जशी आपण प्रेमाची, सहानुभूतीची पाखरण करतो, तशीच वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर करायला हवी. अशा शिक्षकांचा नेहमीच आदर केला जातो. त्यांचा विद्यार्थी जीवनभर सन्मानच करतात.
 *(८) सहनशीलता अणि धैर्य :* 
वर्ग अध्यापन करताना अनेक प्रसंग असे उद्भवतात की तेव्हा राग अनावर येतो. कधी कधी शिक्षकांकडून "क्रोधात् भवति अनर्थ असे घडते. सहनशीलता आणि धैर्य एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अनेकदा शिक्षक धैर्यहीन होऊन विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा करतात. क्रोधाच्या आवेशात चोप देतात. वर्गातील सारेच विद्यार्थी श्रीमंत नाहीत, तसेच ते सारेच हुशारही नाहीत, गरीवीमुळे अनेक समस्या उद्भवतात. त्यातूनच त्यांच्याकडून शिस्तभंग झाल्यासारखे दिसेल, तर मंदबुद्धिने अभ्यास आकलन न झाल्याने एखादा समर्पक उत्तर देऊ शकला नसेल. हे सारे शिक्षकांनी समजून घेऊन विद्यार्थ्यांशी सहनशील आणि धैर्यपूर्ण वागणूक ठेविली पाहिजे.
 *(९) ज्ञानपिपासा :* 
प्रस्तृत कालखंड हा गतीमान कालखंड आहे. ज्ञानाच्या कक्षा सतत रुंदावत आहेत. आपले ज्ञान वाढविण्यासाठी शिक्षकाने सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. ज्ञानाची तहान सतत जागृत ठेवली पाहिजे. ज्ञानाचे क्षेत्र विस्तृत आणि विशाल आहे. अज्ञानी शिक्षक नेहमीच उपेक्षित राहतात. आडातच नसेल तर पोहन्यात कोटून देणार? स्वतः जवळच्या दिव्यातच जर तेल नसेल तर दुसन्याचा दिवा प्रज्वलित क्या करता येईल ? स्वतःलाच जर विषय नीट समजला नसेल तर शिवाक तो कसा समजावून सांगतील ?
 *(१०) वर्गनियंत्रणाचे कौशल्य :* 
वर्गपाठाची तयारी प्रामाणिकपणे करणारे शिक्षक जर तो पाठ्यांश शांततामय वातावरणात आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगू शकत नसतील तर त्यांना यशस्वी शिक्षक होता येणार नाही. आपल्या पाठ्यांशाकडे विद्याध्यचेि अवधान खेचून त्यांना शांत राखण्याचे कौशल्य शिक्षकांजवळ आवश्यक आहे. किशोर आणि कुमारवयीन विद्यार्थी-विद्यार्थीनी जाल्याच खोडकर असतात. म्हणून त्यांचा स्वभाव ओळखून शिक्षकांनी स्वतःच आपले वर्गनियंत्रणकौशल्य वाढविले तर ते उत्तम अध्यापन करू शकतील.
 *(११) वर्गवर्तन :* 
शिक्षकाच्या आचारविचारांचा विद्यार्थ्यांवर फार खोल असा ठसा उमटत असतो. म्हणूनच सर्वसामान्य शिष्टाचारांचे पालन शिक्षकांनी केले पाहिजे. वर्गात अध्यापन करीत असताना आपल्या वागण्याच्या लकबींकडे आत्मनिरीक्षणपूर्वक बघितले पाहिजे. शिक्षकांना विक्षिप्त सवयी नसाव्यात दातांनी नखे काढणे, हातात खडू नाचविणे, विजारीच्या खिशात वारंवार हात घालणे आणि काढणे, डोळे मिचकावणे, निरर्थक हातवारे करणे, पाय हालविणे, नाका-कानातील मळ काढणे, डोळे उगारणे आणि शिव्या देणे अशा सवयीपासून शिक्षकांना दूर राहता आले पाहिजे. शिक्षकांनी नेहमीच शिष्टाचार पाळले पाहिजे. पान चघळणे, तंबाखूचा डुच्चा तोंडात कोंबणे, विडी-सिगरेट ओढणे असे प्रकार वर्गात सर्रास चालतात. विद्यार्थी मनातल्या मनात हसतील, कुचेष्टा करतील अशा वर्तनापासून शिक्षकांनी स्वतःला सांभाळले पाहिजे.
 *(१२) वेशभूषा* 
आपल्या मागच्या पिढीतील शिक्षकांचा पेहराव टापटिपीचा, स्वच्छ आणि भारदस्त असा असे. हल्ली आपल्याला नको असे दोन प्रकार जास्त आढळतात. नेहमीच मळका आणि कसाही गवाळ्यासारखा पोशाख करून शाळेत येणे हा एक प्रकार तर दुसरा अतिआधुनिक असा प्रकार. नीटनेटके राहण्याइतपत वेतन सध्या आपल्या देशात शिक्षकाला निश्चितच मिळते. पण आर्थिक कारणे दाखवून शिक्षक वेषभूपेच्या बाबतीत नेहमीच अनाठायी काटकसर करतो असे आढळते. वर्गात विद्यार्थ्यांसमोर आपल्याला उभे रहावयाचे आहे, याचे भान सतत शिक्षकांनी ठेवावयास हवे. अध्यापन हे जसे शास्त्र आहे, तशीच ती कला आहे. शिक्षकाला आपले कौशल्य त्यासाठी पणाला लावावयाचे असते. तो पाठ्यांश सादर करीत असतो, आणि सादर करणारा हा आकर्षक अपेक्षित आहे. दाढीचे खुंट वाढलेला, मळक्या, गवाळ्या पोशाखातील शिक्षक अध्यापनाचे कार्य यशस्वी कितपत करू शकेल ? अवडंवर नको पण स्वच्छ साधा पोशाख प्रभावी ठरतो हे निश्चितच ।
 *(१३) आवाज :* 
शिक्षणव्यवसायात शिरू पाहणाऱ्या व्यक्तिच्याजवळ आवाजाची देणगी असणे हे अत्यंत आवश्यक आहे. वा व्यवसायाची ही मूलभूत अशी मागणी आहे. पण आपल्याकडे प्रशिक्षणासाठी निवड करताना फक्त सार्वजनिक
असलेल्या आपण बचतो. ही प्रशिक्षणाची भट्टन क प्रशिक्षणाची जर आई आहे, तर स्था व्यवसायात आवश्यक अशा आवाजासारख्या स्मि बाची पूर्ण करणाऱ्या ओदवारांनाच शिक्षक म्हणून प्रशिक्षण दिले पाहिजे.
आधा असलेला शिक्षक प्रभावी करतो. त्याच्या स्वरातील स्पष्टता आणि माधुर्व विद्या विश्व समवाया चूक करते, किमान बांत सर्वांना आपला आवाज ऐकू जाईल असा प्रयत्न सर्वच शिका कदवा हया. श्रय न घेण्याचा अंगीरपणा इथे कामाचा नाही. काही शिक्षक वर्गात नको एवढ्या मोठमोळ्यात शिकवितात, त्याचेही तारतम्य बाळगायला हवे.
 *(१४) समाजसमरसता :* 
परंतु यास शारीरिक, आहे. त आज आ म्हागजे शिकविणे ही द्विधुनी प्रक्रिया आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे ते दोन ध्रुव आहेत. शिक्षण ही तीन ध्रुवांवर चालणारी प्रक्रिया आहे असा विचार काही वर्षापासून मांडला जात आहे. शिक्षक विद्यार्थी या दोन भुवाबरोबरच तिसरा ध्रुव काही शिक्षणतज्ज्ञ 'विषय' सांगतात तर काही शिक्षणतज्ज्ञ 'समाज अथवा परिसर असा सांगतात, काही शिक्षणातज्ज्ञ चार ध्रुवांवर चालणारी प्रक्रिया सांगून शिक्षक आणि विद्यार्थ्यांबरोबाचे विषय आणि परिसर असे दोन ध्रुव सांगतात. हल्ली याच्यापुढे विचार गेला आहे. शिक्षक ही अनेक ध्रुवांवा चालणारी पक्रिया आहे (Multi Polar). सारांश, शिक्षकाचा संबंध केवळ विषय शिकविण्याशी आदि प्रास्तावि विद्याध्यर्थ्यांशी नाही तर तो विद्यार्थी ज्या परिसरातून, समाजातून येतो त्या समाजाशीही आहे. शाळा होच मुझे एक सामाजिक संस्था आहे. म्हणनूच शिक्षकांनी समाजाशी समरस झाले पाहिजे. समाजापासून दूर पळणारा असतो. शिक्षक यशस्वी शिक्षक होऊ शकणार नाही. परू नये
 *(१५) प्रसन्नता:* 
 शिक्षकाचे व्यक्तिमत्व प्रसत्र असावे. शिक्षकाने स्वभावाने सरळ आणि हसतमुख असावे. प्रसालेशिया बैंकले वर्ग पैसा आणि कंटाळवाणा होईल. अध्यापनातून प्रसत्रता निर्माण होणे तर आवश्यकच आहे. त्यामुळे विद्यार्थी येत नाही आणि शिक्षकांचे मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होतील. वर्गात सौहार्द निर्माण होते. वर्गखोली प्रफुल्लित ग्रहले भावडीनुन शिक्षण प्रभावी ठरते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वातील प्रसत्रता ओविद्यार्थ्यांच्या जीवनात उतरते. प्रसत्र विद्यार्थी भाचे जीवनात प्रसत्र जीवन जगतील, समाज आणि राष्ट्र संपन्न करतील.

शिक्षण संक्रमण मार्च १९९१ मधील लेख आहे
लेखिका - डी एम कानडजे
शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय वनोजा
जि.आकोला

Comments

Popular posts from this blog

डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त परळी मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

शिक्षणापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी करत शिक्षणाची संधी उपलब्ध __प्राचार्य डॉ मधुकर आघाव

विद्यार्थ्यांनी खाण्यापिण्याच्या व्यसनासोबतच मोबाईलच्या व्यसनापासूनही दूर राहावे__ डॉ. अनिलकुमार घुगे