Posts

Showing posts from September, 2024

आ.विक्रम काळे यांच्या हस्ते डॉ.मधुकर आघाव यांचा नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्यपदीनिवडीबद्दल सत्कार

Image
वैजनाथ (प्रतिनिधी) :- शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांच्याहस्ते नवगण महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी डॉ मधुकर आघाव यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.                 नवगण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये गेल्या 28 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे डॉ मधुकर आघाव यांची नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्य पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी डॉ.मधुकर आघाव सर यांच्या प्राचार्यपदी नियुक्तीबद्दल पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, माजी नगरसेवक चेतन सौदळे व इतर उपस्थितीत होते. तसेच  शिक्षक मतदार संघाचे आ.विक्रम काळे यांनी नवगण महाविद्यालय येथे भेट दिल्याबद्दल प्राचार्य  डॉ मधुकर आघाव यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थिती होते.

21 व्या शतकात ज्ञान हेच भांडवल: प्राचार्य डॉ. मधुकर आघाव

Image
परळी वैजनाथ:  येथील नवगण शिक्षण संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ आघाव बोलत होते. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की जुन्या काळातील युद्धाचे साहित्य आज वापरून चालणार नाही आज माहिती तंत्रज्ञानाचे युग आहे लढाईची साधने बदललेली आहेत. ज्ञान हे मुख्य भांडवल आहे, ज्ञान हेच हत्यार आहे. या नवयुगातील ज्ञानात्मक साधनांचा आपण उपयोग करायला शिकले पाहिजे. महाविद्यालयांमध्ये यावेळी शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच डॉ आघाव यांची नुकतीच प्राचार्य पदी नियुक्ती केल्यामुळे महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आणि विद्यार्थ्यांतर्फे त्यांचा स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी परळी शहर आणि परिसरातील राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनीही डॉ आघाव यांच्या निवडीबद्दल सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी उपप्राचार्य डॉ लालासाहेब घुमरे व डॉ दयानंद कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना लेखणीची भ